सुरत: गुजरातसह देशभरात गणेशोत्सव(festival) मोठा जोमाने सुरू आहे. पण या गणोशोत्सवाला गालबोल लागणारी घटना घडली आहे. सुरतमध्ये सय्यदपुरा परिसरात समाजकंटकांकडून गणपती मंडपावर दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण सय्यदपुरा परिसरात तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपाींना अटक केली असून 27 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (08 सप्टेंबर) गणपती मंडपावर(festival) काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. यामुळे वातावरण चांगलेच चिघळले होते. संतप्त लोकांनी पोलीस चौकीला घेराव घातला. पण वातावरण चिघळल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तरीही जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करावा लागला. त्यानंतर काही प्रमाणात परिस्थितीती नियंत्रणात आली. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर आमदार कांती बलर हेही घटनास्थळी पोहोचले. याठिकाणी त्यांनी आरोपींना सोडणार नसल्याचे सांगून पोलीस कठोर कारवाई करतील असे आश्वासन दिले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी म्हणाले की, या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून इतर 27 जण ताब्यात आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुरतच्या सर्व भागात पोलीस तैनात आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
सुरतचे पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी सांगितले की, गणपती मंडळावर काही लोकांनी दगडफेक केली, त्यानंतर हाणामारी झाली. पोलिसांनी त्यांना तत्काळ जमाव पांगवण्याचा आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आवश्यक ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. शांतता भंग करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात येत आहे. सुमारे एक हजार पोलिस सर्वत्र तैनात आहेत.
हेही वाचा:
‘लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेत झाला ‘हा’ मोठा बदल; आता…
शरद पवारांचं धक्कातंत्र सुरूच, भाजपच्या बड्या नेत्याकडून ‘तुतारी’चा प्रचार
पत्नीशी भांडून पतीनं नदीत मारली उडी, ८ तासांच्या संघर्षानंतर बचावकार्यात यश