कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनी नैराश्येत; महाविद्यालयाच्या इमारतीवरून घेतली उडी अन्…

अमरावती : कमी गुण मिळाल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने(Student) हाताची नस कापून थेट इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून, मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित महाविद्यालयात बीएचएमएसच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने हा प्रयत्न केला.

21 फेब्रुवारी रोजी 11 वाजताच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विद्यार्थिनीला(Student) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. माहितीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी महाविद्यालय व रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या विद्यार्थिनीने आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत परीक्षेत गुण कमी मिळाल्याचे कारण सांगितले आहे. परंतु, पोलिसांनी मुलीचे ब

याण नोंदविले असता, पाय घसरून पडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले आहे.

विद्यार्थिनीने चाकूच्या साहाय्याने हाताची नस कापली आणि त्यानंतर महाविद्यालयाच्या इमरातीवरून उडी घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेच्या तपासादरम्यान चाकू जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी महाविद्याल परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मुलीने तिसऱ्या माळ्यावरून उडी घेतल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत क्रेन व्यवस्थेतील नियमभंग आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष?

त्या ग्रामपंचायतींना निधी नाही आणखी एक शपथभंग !

हिंदुस्थानी भाऊवर संतापली राखी सावंत; फराह खानला पाठिंबा देत म्हणाली…