नांदेड सकल ओबीसी समाजाचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा

ओबीसी आरक्षणाला (reservation system) कुठलाही धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावं, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा नांदेड येथील सकल ओबीसी समाजाने निवेदनाद्वारे सरकारला दिला आहे. ओबीसी समाज देखील आपली ताकद सरकारला दाखवेल असा इशारा ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांना दिला आहे

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना नांदेड मधून देखील ओबीसी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी बेमुदत उपाेषण सुरू केले आहे.

या आंदोलनाला मराठवाड्यातुन मोठा पाठिंबा मिळतोय. नांदेड मध्ये देखील ओबीसी बांधव यांनी हाके यांना पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले. सकल ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकत्र येत घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देखील देण्यात आले.

हेही वाचा :

पत्नीच्या मृत्यूच्या दुःखात IPS अधिकाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

‘हे’ साध्य करणारा सध्याच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातला मी एकमेव अभिनेता!;किरण मानेंची

महायुती विधानसभे साठी अजित पवार गटाला मदत करणार नाही

.