राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचार, लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. अशा घटना घडल्यानंतर यामध्ये राजकीय हस्तक्षेपही होताना दिसत आहे. अशातच आता दादरमधून संतापजनक बातमी समोर येते(Teacher).

एका पीटीआय शिक्षकाने(Teacher) विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. गौरव चौहान असे शिक्षकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय मुलगी दादरच्या पूर्व भागातील एका शाळेत शिकत आहे. 27 डिसेंबर रोजी मुलगी शाळेत रेसलिंगच्या सरावासाठी आली होती. मुलगी शाळेच्या वर्गात एकटीच असल्याचे पाहून शिक्षक गौरव चौहान हा वर्गात शिरला. वर्गाबाहेर डोकावून बाहेर कोणी नसल्याची खात्री करून गौरवने वर्गाचा दरवाजा बंद केला.
त्यानंतर गौरवने मुलीच्या इच्छेविरोधात तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. शाळेतील पीटी शिक्षकाच्या या वर्तणुकीनंतर मुलगी मानसिक तणावाखाली होती. पालकांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली. यानंतर पालकांनी तत्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गौरव चौहान या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०२३-२०२४ या कालावधीत मुंबईत विनयभंगांची सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले. मुंबईनंतर पुणे, नागपुरात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, यात अत्याचार, अपहरण, हुंडाबळी, विनायभंग यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक अत्याचाराच्या घटना २०२३ मध्ये घडल्या. दरम्यान, राज्यात 2017 मध्ये एकूण 4 हजार 320 घटना घडल्या. तसेच 2018 मध्ये 4 हजार 974 घटना घडल्या आहेत. अशा प्रकारे 2019 मध्ये 5 हजार 412 घटना, 2020 मध्ये 4 हजार 846 घटना, 2021 मध्ये 5 हजार 954 घटना, 2022 मध्ये 7 हजार 84 घटना आणि 2023 मध्ये 7 हजार 521 घटना घडल्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
ठाकरेंना आणखी एक धक्का! दोन मोठ्या नेत्यांचा जय महाराष्ट्र; शिंदे गटात दाखल
पश्चिम महाराष्ट्रात पालकमंत्र्यांचे वाटप स्पष्ट: सातारा शिवेंद्रसिंहराजे भोसलेंकडे, सांगली-सोलापूरचे काय?
‘ये जवानी है दिवानी’ने 11 वर्षांनंतर पुन्हा उडवून दिली खळबळ, पहिल्याच दिवशी…