वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच भारत या स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार नसल्याचं रविवारी स्पष्ट झालं. सिडनीच्या मैदानावर झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात(match) यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत केलं. या विजयासहीत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला असून त्यांनी मालिकाही 3-2 च्या फरकाने खिशात घातली आहे.

भारताकडून केवळ भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चमकदार कामगिरी करता आल्याचं संपूर्ण मालिकेत दिसून आलं. असं असतानाच आता मालिका संपल्यावर बुमराहची चौकशी होणार की काय? अशा अर्थाने एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. मात्र या व्हिडीओसंदर्भात भारताच्याच एका माजी क्रिकेटपटूने मोठा खुलासा केला आहे.
झालं असं की, सामन्यादरम्यान(match) एका क्षणी जसप्रीत बुमराह थांबला आणि त्याने त्याचे बूट काढून पुन्हा घातले. मात्र हे करताना त्याच्या बुटामधून काहीतरी पडल्याचं कॅमेरामध्ये कैद झालं. कसला तरी पांढरा तुकडा बुमराहच्या बूटमधून खाली पडल्याने काही अकाऊंटवरुन आता या प्रकरणी भारताची चौकशी आयसीसीकडून केली जाणार आहे असा दावा करण्यात आला. चेंडू कुरतडल्याप्रकरणी भारताची चौकशी आयसीसीकडून केली जाणार आहे. बुमराहच्या बूटमधून एक विचित्र गोष्ट मैदानात पडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा करणाऱ्या काही पोस्ट व्हायरल झाल्या.
या पोस्टबरोबरच्या व्हिडीओमध्ये बुमराह पायातून बूट काढून तो उलटा करुन झटकताना दिसतोय. यावेळी त्याच्या बुटातून कापसाच्या बोळ्यासारखा दिसणारा एक पांढरा तुकडा पडतो. ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी हा चेंडूंशी छेडछाड करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
That’s a finger protection pad https://t.co/5SMzNCGI8N
— Ashwin (@ashwinravi99) January 5, 2025
मात्र बुमराहच्या बुटातील या कधीत रहस्यमयी वस्तूबद्दल त्याचाच संघसहकारी आणि नुकताच निवृत्त झालेल्या रविचंद्रन अश्वीनने एक खुलासा केला आहे. व्हायरल व्हिडीओ कोट करुन रिट्विट करात अश्वीनने बुटातून पडलेली ती पांढरी गोष्ट काय आहे हे सांगितलं आहे. “ते फिंगर प्रोटेक्शन पॅड आहे,” असं अश्वीनने सांगत पुढे हसण्याचे इमोजी वापरलेत.
फिंगर प्रोटेक्शन पॅड हे सामान्यपणे शू बाईट होऊ नये म्हणजेच शूजमुळे बोटांना दुखापत होऊ नये म्हणून बोट आणि बुटांच्यामधल्या गॅपमध्ये ठेवलं जातं.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 कधी जमा होणार? मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट
ब्रेकिंग! प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक
मनोज जरांगे कोणाच्या फोननंतर पुण्यातील मोर्चा सोडून माघारी, समोर आलं कारण