या ऑफरला तोड नाही! इतक्या स्वस्तात पुन्हा मिळणार नाही OnePlus चा 5G फोन

OnePlus

OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन कंपनीनं मिड रेंजमध्ये सादर केला होता. जास्तीत जास्त युजर्सना वनप्लस ब्रँडची ओळख करून देता यावी म्हणून कंपनी नॉर्ड सीरिजमध्ये स्मार्टफोन सादर करते.

आता अ‍ॅमेझॉन इंडियावर OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनमोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. पहिल्यांदाच इतका बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

किंमत आणि ऑफर्स

हा वनप्लस फोन अ‍ॅमेझॉनवर सध्या 23,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तुम्ही सिटी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून 2 हजार रुपयांची बचत करू शकता. एक्सचेंज ऑफर अंतगर्त काही निवडक हँडसेटवर 3 हजार रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट दिला जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये 16,250 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. हा डिस्काउंट मिळाल्यास OnePlus Nord CE 2 5G तुम्ही फक्त 2749 रुपयांमध्ये घरी आणू शकता.

OnePlus Nord CE 2 चे स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 2 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या वनप्लसमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपसाठी यातील 4,500एमएएचची बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वनप्लस नॉर्ड सीई 2 5जी फोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ फ्लूड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 च्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. यात अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजनओएस 11 मिळतो. कंपनीनं यात मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेट एआरएम माली-जी68 एमसी4 जीपीयूसह दिला आहे. सोबत 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते.

Smart News:-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *