‘अजुनही ही दुधखुळीच?’; केतकीची बाजू घेणाऱ्या पोंक्षेंना टिळेकरांचा सवाल…

Smart News:- निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) अनेकदा सामाजिक,राजकीय,मनोरंजन क्षेत्रासंबंधिक अनेक वादग्रस्त विषयांवर परखडपणे सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार(Sharad Pawar) यांच्या विरोधात वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे सध्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitle) १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी अंतर्गत जेलची हवा खात आहे. केतकी चितळे प्रकरण भलतंच तापलंय. अजूनही यावरनं वादाचा भडका अधनं-मधनं उडताना दिसतो. केतकीची बाजू घेत अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी तिच्या लहान वयाचा दाखला देत,तिला एक संधी द्यावी,त्याचं राजकारण करू नये अशा शब्दात आपली भूमिका मांडली होती. पण आता यावरुन महेश टिळेकरांनी शरद पोंक्षेंना चांगलंच सुनावताना लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
शरद पोंक्षेंनी केतकीची बाजू घेत म्हटलं होतं,”आपण सोशल मीडियावर काय शेअर करतो हे माहित असायला पाहिजे. केतकी अजूनही लहान मुलगी आहे. त्यामुळे तिला सुधारण्याची संधी मिळायला हवी असं मला वाटत. शरद पोंक्षे यांच्या या मतप्रदर्शनावर आता निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी त्यांना केतकी संदर्भात असलेल्या अनेक वादग्रस्त प्रकरणांचे दाखले देत प्रश्न विचारत पलटवार केला आहे”.
Smart News:-
उद्या पुण्यात राजगर्जना; मात्र पाळावे लागतील हे 13 नियम, अन्यथा…
मंडणगड :- बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी; मंजूर कामे रखडली
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल ९.५० रु. डिझेल ७ रु. स्वस्त तर LPG सिलेंडरवर २०० रुपयांची सबसिडी
लंडनमधून भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना जयशंकर यांनी फटकारले, म्हणाले…