5G, 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 18 हजारांची सूट;

5G

Xiaomi 11i 5G स्मार्टफोन खूप स्वस्तात विकला जात आहे. हा फोन 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5160mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे.

सध्या हा फोन Flipkart वरून बंपर डिस्काउंटसह विकत घेता येईल. चला जाणून घेऊया शाओमीच्या या जबरदस्त स्मार्टफोनची किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 11i 5G किंमत आणि ऑफर

Xiaomi 11i 5G च्या बेस व्हेरिएंटची किंमत 24999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवरून हा डिवाइस ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून आणखी बचत करू शकता. फ्लिपकार्ट 16000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे.

Xiaomi 11i 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

शाओमी 11आय 5जी मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1200निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 3.0 वर चालतो. तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि माली जी68 जीपीयू प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. सोबत LPDDR4x RAM आणि UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे.

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सीरिजची सर्वात मोठी खासियत बॅटरी सेगमेंट आहे. तसेच Xiaomi 11i स्मार्टफोनमध्ये 5,160एमएएच बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.

Smart News:-

हायड्रोजनवर चालणाऱ्या कारसाठी ३ हजार कोटींचे मिशन : नितीन गडकरी


कोल्हापूर: गोकुळ’कडून दूध खरेदी दरात केली ‘इतकी’ दरवाढ


महाराष्ट्राच्या 433.74 कोटी रुपयांच्या कचऱ्यावरील प्रक्रिया प्रस्तावाला मंजुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *