Airtel यूजर्संना १०९ रुपयात ३० दिवसाची वैधता, जिओच्या तुलनेत…

एअरटेलने आपल्या (airtel customer) यूजर्ससाठी मोठी भेट दिली आहे. कंपनीने एकाचवेळी ४ प्लानला लाँच केले आहे. ज्यात दोन मंथली वैधतेचे प्लान आहेत. याची जोरदार चर्चा सुरू आहे. यातील एक प्लान १०९ रुपयाचा आहे. ज्यात ३० दिवसाची वैधता मिळते. तर दुसरा प्लान १११ रुपयाचा आहे. ज्यात पूर्ण महिन्याची वैधता मिळते. यूजर्संना कमी पैशात महिनाभर अॅक्टिव राहता येते. भारतीय मोबाइल बाजारात एअरटेल १०९ रुपये आणि १११ रुपयाच्या प्लानची जोरदार चर्चा सुरू आहे. सोबत जिओच्या प्लान सोबत चर्चा सुद्धा केली जात आहे. जाणून घ्या या प्लानसंबंधी.
एअरटेलचा १०९ रुपयाचा आणि १११ रुपयाचा प्लान
एअरटेलच्या १०९ रुपये आणि १११ रुपयाच्या प्लानमध्ये फक्त एका दिवसाचा फरक आहे. बाकी प्लान सेम आहे. १०९ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला पूर्ण ३० दिवसाची वैधता मिळते. (airtel customer) तर १११ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला १ महिन्याची वैधता मिळते. म्हणजेच ज्या दिवसापासून प्लान सुरू होईल त्याची पुढील रिचार्जची तारीख त्याच दिवशी पासून सुरू होईल. जुलै मध्ये ३१ दिवसाचा महिना आहे तर तुम्हाला पूर्ण ३१ दिवस मिळतील.
दुसऱ्या बेनिफिटमध्ये दोन्ही प्लानमध्ये तुम्हाला ९९९ रुपयाचा टॉकटाइम मिळतो. या ठिकाणी लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी यात २.५ पैसे प्रति सेकंद चार्ज लावले जातील. तसेच यात तुम्हाला २०० एमबी डेटा सुद्धा मिळतो. तर एसएमएससाठी कंपनी दोन प्रकारचे शुल्क लागू करते. लोकल एसएमएस वर १ रुपये प्रति एसएमएसचे शुल्क तर एसटीडी एसएमएस वर तुम्हाला १.५ रुपये शुल्क द्यावे लागेल.
जिओ फोन रिचार्ज प्लान
या ठिकाणी आम्ही जिओचा स्वस्त ४ जी फोन संबंधी माहिती देत आहोत. १०० रुपयाच्या जवळपास जिओ फोनसाठी तीन प्रकारचे प्लान आहे. पहिला प्लान ७५ रुपयाचा आहे. तर दुसरा प्लान ९१ रुपयाचा आहे. तिसरा प्लान १२५ रुपयाचा आहे. ७५ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला २३ दिवसाची वैधता मिळते. तर कंपनी अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेली १०० एमबी डेटा सोबत २०० एमबी अतिरिक्त डेटा फ्री देत आहे.
सोबत ५० एसएमएस आणि जिओ अॅप सर्विस तुम्हाला या प्लानमध्ये मिळते. ९१ रुपयाच्या प्लानध्ये तुम्हाला २८ दिवसाची वैधता मिळते. सोबत १०० एमबी रोज डेटा सोबत २०० एमबी अतिरिक्त डेटा दिला जातो. यात ५० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. १२५ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला २३ दिवसाची वैधता मिळते. रोज ५०० एमबी डेटा दिला जातो. एकूण ११.५ जीबी डेटा चा वापर करता येतो. सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस सोबत जिओ अॅप मिळते.
हेही वाचा :