Airtel चा धमाकेदार प्लॅन; Netflix सोबतच इतरही फायदे इतके की…

टेलिकॉम कंपनी एअरटेल (airtel telecom) आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स घेऊन येत असते. आता पुन्हा एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी Xstream फायबर ब्रॉडबँड प्लॅन घेऊन आलीय. यामध्ये 3 नवीन प्लॅन लॉंच केले आहेत.या प्लॅनची किंमत 699 रुपये, 1099 रुपये आणि 1599 रुपये आहे. या प्लॅन्समुळे तुम्हाला नेमके कोणते फायदे होणार आहेत याबद्दलची माहिती देऊ.

1599 रूपयांचा प्लॅन
Airtel चा 1599 रूपयांचा प्लॅन कंपनीच्या 1498 रूपयांच्या प्लॅन सारखाच आहे. पण या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला Airtel 4K Xstream Box डिवाइस आणि 350 पेक्षा जास्त चॅनल मिळतील. तुम्हाला बॉक्ससाठी एक वेळचे 2000 रुपये द्यावे लागतील, या बॉक्ससह तुम्ही केबल टीव्ही पाहण्यासोबत OTT चा आनंद घेऊ शकाल.(airtel telecom)

यासह Amazon Prime, Netflix आणि Disney + Hotstar 300 एमबीपीएसच्या स्पीडसह मोफत पाहता येणार आहे. तसेच तुम्हाला Eros Now, SonyLIV, Hoichoi, Lionsgate Play, Shemaroo, ManoramaMax, HungamaPlay, Ultra, DivoTV, EPICon, Klikk, Dollywood, Nammaflix आणि Shorts TV यासह 14 OTT प्लॅटफॉर्म Airtel Xtreme Premium सिंगल लॉगिनवर पाहता येईल. या प्लॅनमध्ये मासिक 3.3TB उर्फ ​​3300GB डेटा उपलब्ध असेल.

1099 रूपयांचा प्लॅन
Airtel 1099 रूपयांच्या प्लॅनमध्ये OTT फायदे 1599 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत, फरक एवढाच आहे की तुम्हाला या प्लॅनमध्ये Netflix चा लाभ मिळणार नाही. परंतु तुम्ही इतर सर्व OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकाल. एअरटेल एक्सस्ट्रीम बॉक्स ऑफर देखील या प्लॅनसह वैध आहे आणि वापरकर्त्यांना 350 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल देखील मिळतील. या प्लॅनमध्ये 200एमबीपीएसच्या स्पीडसह 3.3TB डेटा दिला जात आहे.

699 रूपयांचा प्लॅन
Airtel च्या 699 रुपयांच्या या ब्रॉडबँड प्लॅनसह, वापरकर्त्यांना वर नमूद केलेल्या सर्व OTT प्लॅटफॉर्मवर 40Mbps च्या गतीने प्रवेश मिळेल. परंतु या प्लॅनसह केवळ तुम्हाला Amazon Prime Video आणि Netflix चा लाभ मिळणार नाही. या प्लॅनमध्ये दरमहा 3300 GB डेटासह टीव्ही ऑफर देखील उपलब्ध असतील.

हेही वाचा :


टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! व्यस्त वेळापत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *