Apple Watch मध्ये येणार जीव वाचवणारं फीचर…

ऍपल मुळे जीव वाचल्याचा अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. वॉचमधील फीचर्स वेळेवर आजारांची माहिती देतात त्यामुळे हे जीव वाचतात. आता अजून एक जीव वाचवणारं फीचा Apple मध्ये देण्यात येईल.
Apple लवकरच आपल्या स्मार्टवॉचमध्ये नवीन फीचर रोल आउट करणार आहे. अॅप्पल वॉचला फीचरच्या माध्यमातून सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी मिळेल.
सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीमुळे आपत्कालीन परिस्तिथीत वॉचवरूनच टेक्स्ट मेसेज आणि SOS कॉल करता येईल. विशेष म्हणजे हे फिचर फीचर सेलुलर अर्थात मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागांमध्ये देखील इमरजेंसी कॉल करण्यासाठी वापरता येईल. मनगटावरील सेन्सरमधून माहिती घेऊन हा कॉल केला जाईल, अशी माहिती ब्लूमबर्गच्या रिपोर्टमधून मिळाली आहे.
आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून अॅप्पल आपल्या डिवाइसेजमध्ये पर्यायी कनेक्टिव्हिटी देण्याची तयारी करत आहे. फक्त वॉच नव्हे तर आगामी iPhone 14 सीरिजमध्ये देखील हे फिचर मिळू शकतं. उभा फीचरच्या मदतीनं आपत्कालीन प्रसंगी कॉन्टॅक्ट्सना मेसेज करता येईल. जिथे मोबाईल नेटवर्क नसेल तिथून देखील मेसेज करता येईल. आपत्कालीन मेसेज अॅपमध्ये ग्रे बबलमध्ये दिसतील. हे काम पहिल्या टप्प्यात केलं जाईल.
दार दुसऱ्या टप्प्यात युजर्सना कार, जहाज किंवा विमान क्रॅश रिपोर्ट करण्याचा पर्याय मिळेल. या फीचरच्या माध्यमातून दिलेली ही माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना दिली जाईल. हे फीचर युजर्सना मदत हवी का हे देखील विचारेल. परंतु Apple नं या फीचर्सची कोणीतही अधिकृत माहिती दिली नाही.
सर्वसामान्यांना आणखी एक झटका, गोकूळ दूध 4 रुपयांनी महागले
गुणरत्न सदावर्ते यांना आता पुणे पोलीस अटक करणार?
Alia Bhatt साठी बॉडीगार्डची इमोशनल पोस्ट
World Art Day:आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेच्या दिवसाचे महत्व जाणून घ्या