e-Shram Card Alert: ‘या’ यादीत तुमचं नाव असेल, तर हप्त्याचे पैसे अडकलेच म्हणून समजा

राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही आपापल्या स्तरावर विविध योजना (e-Shram Card) राबवत असतात. मोफत आणि स्वस्त रेशन, विमा संरक्षण, शिक्षण, रोजगार अशा अनेक प्रकारच्या योजना सध्या देशात सुरू आहेत.

अशीच एक योजना म्हणजे ई-श्रम कार्ड योजना. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सरकार ई-श्रम कार्ड (e-Shram Card) योजना राबवते. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना दरमहा 500 रुपयांचा हप्ता देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येनं कामगार या योजनेशी जोडले गेले आहेत आणि त्याचा लाभही घेत आहेत.

परंतु या योजनेशी संबंधित काही लोक आहेत, ज्यांच्या काही चुकांमुळे त्यांच्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशा कोणत्या चुका आहेत, ज्यामुळे पैसे अडकू शकतात.ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत ‘या’ लोकांना हप्त्या मिळण्यास येऊ शकते अडचण जर तुम्ही ई-श्रम कार्ड योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल आणि ती अशी योजना आहे जी कामगार मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे, तर त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात आणि तुमचा अर्ज रद्दही होऊ शकतो.
ज्यांनी अर्जाच्या वेळी चुकीची कागदपत्रे अपलोड केली आहेत किंवा कागदपत्रे अजिबात अपलोड केलेली नाहीत, अशा लोकांचे हप्त्याचे पैसेही अडकू शकतात. तुमचे कोणतंही दस्तऐवज चुकलं असल्यास किंवा चुकीचं अपलोड केलं असल्यास अशा परिस्थितीत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा तुमच्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.

जर तुम्हाला ई-श्रम कार्ड मिळाले, परंतु तुम्ही आधीच पेन्शनधारक आहात. तर अशा परिस्थितीत तुमचे हप्त्याचे पैसे तर रोखले जातीलच पण तुमचा अर्जही रद्द केला जाईल.

जर तुम्ही ई-श्रम कार्डसाठी अर्ज केल्याचा दावा करत असाल, परंतु परंतु तुमची नोंदणी बनावट वेबसाइटद्वारे केली गेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचा अर्ज रद्द झाल्याचा विचार करून तुम्हाला हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.
वरील सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही ई-श्रम कार्ड योजनेच्या यादीतून वगळले जाऊ शकता.

Smart News :


अमृता फडणवीस काय बोलून गेल्या, उद्धव ठाकरे म्हणजे

Leave a Reply

Your email address will not be published.