Facebook ची मोठी घोषणा, 31 मेपासून बंद होणार 4 महत्त्वाचे फीचर्स

फेसबुक (Facebook) लवकरच काही फीचर्स (facebook features) बंद करणार आहे. फेसबुकचं नियरबाय फ्रेंड्स फीचर 31 मे पासून उपलब्ध होणार आहे. या फीचरद्वारे लोकांना फेसबुक युजर्ससह आपलं सध्याचं लोकेशन शेअर करता येत होतं.

कंपनीने युजर्सला नियरबाय फ्रेंड्स फीचर (Nearby Friends) आणि इतर लोकेशन बेस्ड फीचर्स बंद होण्याबाबत सूचित केलं आहे. Nearby Friends या फीचरसह फेसबुक वेदर अलर्ट (Weather Alert), लोकेशन हिस्ट्री (Location History) आणि बॅकग्राउंड लोकेशनही (Background Location) बंद करणार आहे. ट्विटरवर अनेक युजर पोस्टनुसार, फेसबुकने Facebook App वर एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून फ्रेंड्स नियरबाय फीचर बंद करण्याची घोषणा केली आहे. युजर्सला पाठवण्यात आलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये कंपनीने सांगितलं, की या फीचरद्वारे कोणते फ्रेंड्स तुमच्या जवळपास आहेत, हे सांगणारं नियरबाय फीचर 31 मे 2022 पासून उपलब्ध होणार नाही.

बंद होणार हे फीचर्स – वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री, बॅकग्राउंड लोकेशनसह इतर लोकेशन बेस्ड फंक्शनदेखील (facebook features) फेसबुकवरुन हटवण्यात येणार आहेत. कंपनीने युजर्सला लोकेशन हिस्ट्रीसह आपला डेटा डाउनलोड करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर ते हटवलं जाईल. परंतु फेसबुकने असंही स्पष्ट केलं, की ते इतर अनुभवांसाठी युजर्सच्या लोकेशनची माहिती मिळवणं चालूच ठेवेल.

2014 मध्ये आलं होतं नियरबाय फ्रेंड्स फीचर – फेसबुकने 2014 मध्ये iOS आणि अँड्रॉइड दोन्हीसाठी नियरबाय फ्रेंड्स फीचर रोल आउट करण्यास सुरूवात केली होती. या फीचरमुळे कोणता मित्र तुमच्या जवळपास आहे याची माहिती मिळते. एकदा नियरबाय फ्रेंड्स ऑन केल्यानंतर तुमचे फ्रेंड्स आजूबाजूला असल्यास सूचित केलं जातं, जेणेकरुन तुम्ही त्यांना संपर्क करू शकाल किंवा भेटू शकाल. परंतु आता हे लोकेशन बेस्ड फीचर बंद होणार आहे.

हेही वाचा :


कोल्हापूर : पुलांच्या विरोधात शिरोळमध्ये आंदोलन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *