अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने झाले स्वस्त चांदीतही घसरण

इच्छूक असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज पुन्हा एकदा सोने स्वस्थ झाले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याच्या (Gold) दरात घसरण सुरूच आहे. यंदा तीन मे रोजी अक्षय तृतीया(akshay tritiya) आहे. अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त माणण्यात येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, आणि यंदा सोन्याचे दर स्वस्त झाल्याने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोने पे सुहागा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे बाजारात सोन्याची मागणी(akshay tritiya) वाढली असताना देखील सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति ग्रॅम 48 हजार रुपये इतके आहेत. गुरुवारी सोन्याचे दर 48 हजार 450 रुपये इतके होते. याचाच अर्थ आज पुन्हा एकदा सोन्यचे दर 450 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 370 रुपये इतके आहेत.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
आज 22 कॅरट सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे जवळपास 450 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर 24 कॅरट सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार रुपये इतके असून 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 370 रुपये आहेत. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार 80 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर 52 हजार 450 रुपये इतके आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार 80 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर 52 हजार 450 रुपयांवर पोहोचले आहेत.
चांदीही झाली स्वस्त
केवळ सोन्याचेच दर नाही तर चांदीच्या दरांमध्ये देखील मोठी घसरण पहायला मिळते आहे. दोन आठवड्यांपूर्वी चांदीचा दर प्रति किलो 70 हजार रुपयांवर पोहोचला होता. मात्र आता त्यामध्ये घसरण पहायला मिळत असून, चांदीचे दर तेव्हापासून ते आतापर्यंत किलोमागे तब्बल सहा हजारांनी कमी झाले आहेत. आज चांदीचा दर प्रति किलो 64 हजार रुपये इतका आहे. सोन्या-चांदीच्या दरामध्ये घसरण सुरू असल्याने गुंतवणूकदारांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरणण पहायला मिळत आहे.
हेही वाचा: