BSNL ग्राहकांसाठी Good News!

आपल्यापैकी असा कोणीही नसेल ज्याने कोणत्याही टेलिकॉम कंपनीचा रिचार्ज प्लॅन घेतला नाही. टेलिकॉम प्लॅन ही आमची गरज आहे, ज्यामध्ये कॉलिंग आणि एसएमएससह डेटा आणि इतर बेनिफिट्स मिळतात.(bsnl broadband)
तुम्ही सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे (BSNL) सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीएसएनएलने आपल्या लोकप्रिय प्रीपेड प्लॅनचे फायदे वाढवले आहेत.(bsnl broadband)
बीएसएनएलच्या (BSNL) वार्षिक प्रीपेड प्लॅनची वैधता (Validity) वाढवण्यात आली आहे. आधी हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येत होता. मात्र, आता या प्लॅनमध्ये 60 दिवसांची अतिरिक्त वैधता वाढवून दिली जात आहे. म्हणजेच आता या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत 425 दिवसांची वैधता मिळत आहे. या वैधतेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जूनपर्यंत मुदत आहे.
बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 2,399 रुपये आहे. या किंमतीच्या बदल्यात कंपनीकडून ग्राहकांना त्यांच्या शहर आणि स्थानिक सेवा क्षेत्रात अमर्यादित लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे, तसेच नॅशनल रोमिंगच्या सुविधा दिली जात आहे. यामध्ये मुंबई आणि दिल्लीतील एमटीएनएल नेटवर्कवर सुद्धा सुविधा देण्यात येत आहे. हा प्लॅन 2GB दैनंदिन डेटा आणि 100 SMS प्रतिदिन या सुविधेसह येतो. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40Kbps इतका कमी होईल.
या प्रीपेड प्लॅनमध्ये ‘हे’ अतिरिक्त फायदे मिळतील
कॉलिंग आणि डेटा सोबतच बीएसएनएलच्या या 2,399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी पर्सनल रिंग बॅक टोन (PRBT) आणि अनलिमिटेड सॉन्ग एक्सचेंजचा ऑप्शन देण्यात आला आहे. हा प्लॅन 30 दिवसांसाठी एरॉस नॉव एंटरटेन्मेंटच्या सब्सक्रिप्शनसह येतो. दरम्यान, आधी सांगितल्याप्रमाणे, तुमच्याकडे या प्लॅनमधील अतिरिक्त वैधतेचा लाभ घेण्यासाठी फक्त जून अखेरपर्यंत वेळ आहे.
हेही वाचा :