जियो ग्राहकांसाठी खुशखबर !

jio sim

जर तुम्ही जियो सिम  (jio sim) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या चार्जेस मध्ये वाढ केली आहे.

याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. अशातच जियोने ग्राहकांसाठी एक फायद्याचा प्लॅन उपलब्ध केला आहे.

रिलायन्स जिओ भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. 2016 मध्‍ये आपल्‍या कार्यास सुरूवात करणा-या कंपनीने फार कमी कालावधीत लोकांच्या हृदयात स्‍वत:चे स्थान निर्माण केले आहे. रिलायन्स जिओ कंपनी(jio sim) आपल्या ग्राहकांना कधीही निराश करत नाही. यूजर्सच्या सुविधा पाहता कंपनी नेहमीच नवनवीन प्लान आणि ऑफर्स देत असते.

जर तुम्ही Jio चे सदस्य असाल आणि तुम्हाला स्वस्त दरात उत्तम प्लान हवा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही Jio च्या एका जबरदस्त प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दररोज अमर्यादित कॉलिंग तसेच अमर्यादित डेटा देखील उपलब्ध आहे.

Reliance Jio 296 प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओ कंपनीचा 296 रुपयांचा प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो, म्हणजेच तुम्ही हा प्लान एका महिन्यासाठी वापरू शकता. रिलायन्स जिओ कंपनीचा हा एकमेव प्लान आहे, जो 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 25 जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजे हा डेटा तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही उपलब्ध असलेला इंटरनेट डेटा एका आठवड्यासाठी किंवा महिनाभरासाठी वापरू शकता.

या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, लोकांना संवाद साधण्यासाठी सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या मित्रांशी तासन् तास बोलू शकता.

या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये तुम्हाला JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. जिओ कंपनीचा हा प्लान अशा यूजर्ससाठी खूप चांगला आहे ज्यांना जास्त डेटाची गरज नाही.

हेही वाचा :


तरुणानेच प्रेयसीचा केला भयावह अंत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *