Google ची मोठी अ‍ॅक्शन! एकत्र हटवणार 9 लाख अ‍ॅप्स!

Google नं मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी अँड्रॉइडवरील रेकॉर्डिंग अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आता थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करून तुम्ही कॉल्स रेकॉर्ड करू शकणार नाही.

आता तर यापेक्षा मोठी अ‍ॅक्शन गुगलनं घेतली आहे. कंपनीनं सुमारे 9 लाख अ‍ॅप्स हटवण्याची योजना बनवली आहे. यातील काही अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये देखील इन्स्टॉल केलेले असू शकतात.

9 लाख अ‍ॅप हटवणार गुगल

गुगल प्ले स्टोरवरून सुमारे नऊ लाख असे अ‍ॅप काढून टाकण्यात येणार आहेत, ज्यांचे अपडेट जारी केले जात नाहीत. अँड्रॉइड अथॉरिटीच्या रिपोर्टनुसार, असे केल्यास गुगल अ‍ॅप स्टोरवरील अ‍ॅप्सची संख्या मोठ्याप्रमाणावर कमी होईल. अ‍ॅप्पलनं देखील अ‍ॅप स्टोरवरून गेल्या दोन वर्षांत अपडेट न झालेल्या अ‍ॅप्सना न काढण्याचा निर्णय घेतला होता.

आता करता येणार नाही डाउनलोड

मीडिया रिपोर्टनुसार, गुगल आणि अ‍ॅप्पलनं युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेतला आहे. गुगल ते अ‍ॅप्स प्लेस्टोरवरून लपवणार आहे जे अपडेट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे अ‍ॅप्स युजर्सना डाउनलोड करता येणार नाहीत. हे अ‍ॅप्स नव्या एपीआय आणि पद्धतीचा वापर करत नाहीत, म्हणून हे जास्त सुरक्षित नाहीत.

म्हणून बंद केली कॉल रेकॉर्डिंग

Google च्या नवीन Play Store पॉलिसीनुसार, थर्ड पार्टी अ‍ॅप्सना कॉल रेकॉर्डिंगची परवानगी मागता येणार नाही. त्यामुळे ट्रू-कॉलर, ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डर, क्यूब एसीआर आणि अन्य अनेक लोकप्रिय अ‍ॅप बंद होऊ शकतात. परंतु ज्या Android फोनच्या डायलरमध्ये डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग सुविधा आहे, त्या फोन्समधून कॉल रेकॉर्ड करता येतील.

हेही वाचा :


बॅंकेतील व्यवहारांना पॅनकार्डचे बंधन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *