तुमचं फेसबुक हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी कराच

फेसबुक (Facebook) पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. एकीकडे फेसबुकची (facebook security)मोठी लोकप्रियता असताना, दुसरीकडे फेसबुक हॅकिंगची प्रकरणंही वाढली आहेत. परंतु काही सिक्योरिटी, प्रायव्हसी टीप्स (Security and Privacy Tips) लक्षात ठेवल्यास तुमचं फेसबुक अकाउंट सुरक्षित (Facebook Account Secure) ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते.
– सर्वात आधी फेसबुकचा पासवर्ड (Facebook Password) अतिशय मजबूत आणि यूनिक असणं गरजेचं आहे. पासवर्ड म्हणून तुमचं नाव, नंबर, जन्मतारीख किंवा ठिकाणाचं नाव ठेवू नका. तसंच तुमचा पासवर्ड कोणत्याही व्यक्तीशी शेअर करू नका. एका सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड दुसऱ्या सोशल मीडिया अकाउंटसाठी सारखाच ठेवू नका. सर्व अकाउंट्सचे पासवर्ड वेगवेगळे ठेवणं फायद्याचं ठरतं.
– टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) फेसबुकच्या सुरक्षेसाठी वापरणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. 2FA इनेबल करुन अकाउंटची सुरक्षा वाढवता येते. कोणत्याही इतर डिव्हाइसमधून फेसबुक लॉगइन झालं, तर त्याची माहिती मिळते तसंच कोड टाकल्याशिवाय फेसबुक लॉगइन करता येत नाही.
– अनोळखी लॉगइन अलर्टबाबतही फेसबुक माहिती देतं. अनोळखी फोनमधून लॉगइन झाल्यास त्याची माहिती देण्यासाठीही फेसबुकचं सिक्योरिटी फीचर आहे. फेसबुक युजरला Unrecognized Login Alert इनेबल करण्याचा ऑप्शन देतो.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट (Facebook Friend Request) अॅक्सेप्ट करू नका. फेक अकाउंटमुळे अकाउंट हॅक (Facebook Fake Account) होण्यासह मोठा धोका असतो. यामुळे स्पॅम होऊ शकतो.
– फेसबुकवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. मेसेंजरमध्ये कोणी लिंक पाठवली असल्यास त्यावर क्लिक करू नका. क्लिक केल्यास पुढील कोणतीही प्रोसेस करू नका. तसंच लिंकवरुन App डाउनलोड करण्यास सांगितल्यास डाउनलोड करू नका. लिंकवरुन कोणताही फॉर्म, ऑफर, डिस्काउंटमध्ये अडकू नका.
हेही वाचा :