‘ही’ कंपनी फक्त ४९ रुपयांत देतेय १८० दिवसांची व्हॅलिडिटी…

भारतीय टेलिकॉम (indian telecom company) मार्केटमध्ये Airtel, Reliance Jio , Vodafone-Idea आणि BSNL कंपन्या त्यांच्या यूजर्सना एकापेक्षा जास्त प्लान ऑफर करत आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी या चार कंपन्या कायमच उत्तम फायद्यांसह स्वस्त प्लान्स सादर करत असतात. पण, या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी, बाजारात आणखी एक दिग्गज कंपनी आहे. जिचे नाव MTNL आहे. या कंपनीचे सिम अजूनही अनेक ग्राहक वापरतात आणि ही कंपनी कमी खर्चात अधिक व्हॅलिडिटी असलेले प्लान्स पुरविते. आज आम्ही तुम्हाला MTNL च्या अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये ४९ रुपयांमध्ये युजर्सना १८० दिवसांची वैधता मिळते.

MTNLपाच ४९ रुपयांचा प्लान:

या प्लानची किंमत ४९ रुपये आहे. यामध्ये यूजर्सना १८० दिवसांची दीर्घ वैधता दिली जाईल. आता त्यात कोणते फायदे मिळतात तेही जाणून घेऊया. यामध्ये युजर्सना ६० लोकल मिनिटे आणि २० STD मिनिटे दिली जातील. कॉल चार्जेसबद्दल बोलायचे झाले तर ,ते प्रति सेकंद १ पैसे आणि १ पैसे प्रति सेकंद या दराने आकारले जातात . तसेच, एसएमएस शुल्क लोकलसाठी ०.५० पैसे, राष्ट्रीयसाठी १.५० रुपये आणि आंतरराष्ट्रीयसाठी ५ रुपये आहे. त्याच वेळी, जर तुम्ही डेटा वापरत असाल तर तुम्हाला प्रति एमबी ३ पैसे मोजावे लागतील.(indian telecom company)

Airtel-Jio-Vi-BSNL ला जोरदार टक्कर

तसे पाहता एमटीएनएलच्या या प्लानमध्ये ग्राहकांना खूप बेनेफिट्स दिले जात नाही. पण,, जर १८० दिवसांची वैधता ४९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल, तर या प्लानकडे दुर्लक्ष देखील करता येणार नाही. इतर कंपन्या असा कोणताही प्लान ऑफर करत नाहीत. एमटीएनएलचा हा प्लान युजर्सना त्यांचा नंबर दीर्घ कालावधीसाठी कार्यरत ठेवण्याची परवानगी देते.

तुम्ही Jio युजर असाल तर, टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे ४१९ रुपयांचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. याशिवाय, अतिरिक्त ६ जीबी डेटा आणि १ वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइलचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

हेही वाचा :


धोनीचे T20 मध्ये अनोखे ‘द्विशतक’!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *