आयफोन १४ सिरीजच्या किंमती लिक, ग्राहकाना बसणार झटका !

आयफोन १४ सिरीज लाँच (launch) होण्याचे दिवस आता जवळ आले असून या फोन सिरीज बाबत आत्तापर्यंत अनेक लिक्स आले आहेत. त्यात फीचर्स, किंमती लिक झाल्या होत्या पण त्याला कंपनीने अधिकृत दुजोरा दिलेला नव्हता.

आता नवीन रिपोर्ट नुसार आयफोन १४ (launch) विशेष अपग्रेड व हायर प्रायसिंग सह येतील. म्हणजेच आयफोन १४ ची चारही मॉडेल्स पूर्वीच्या तुलनेत किंमतीने अधिक असतील.

‘द सन ‘ या लोकप्रिय वृत्तपत्रात, विश्लेषक ग्रुप बेसबश सिक्युरिटीजचे प्रमुख डॅन इवेस यांच्या म्हणण्यानुसार आयफोन १४ ची किंमत १०० डॉलर्स असेल. म्हणजे आयफोन १३ पेक्षा तो महाग आहे. सिरीज १४ मधील फोन्सच्या किमती कश्या असतील या विषयी सांगताना ते म्हणाले,

आयफोन १४, ८९९ डॉलर्स म्हणजे ७१७३० रुपये,

आयफोन १४ मॅक्स ९९९ डॉलर्स म्हणजे ७९७०९ रुपये

आयफोन १४ प्रो १०९९ डॉलर्स म्हणजे ८७६८९ रुपये

आयफोन १४ प्रो मॅक्स ११९९ डॉलर्स म्हणजे ९५६६७ रुपये

किमतीला असतील. मिनी साठी मागणी अगदीच कमी असल्याने त्याजागी मॅक्स येईल.

आयफोन १४ प्रो आणि मॅक्स दोन्हीसाठी ६.७ इंची डिस्प्ले दिला जाईल. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांच्या म्हणण्यानुसार १४ प्रो आणि प्रो मॅक्स ऑलवेज ऑन डिस्प्ले मोड सह येतील.

हेही वाचा :

भारतात SUV खरेदीची क्रेझ, कंपन्यांनी 5 वर्षांत 36 मॉडेल केले लाँच, कारणं जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published.