आता सिग्नलशिवाय iPhone वापरता येणार; आपात्कालिन स्थिती मेसेजही पाठवू शकाल!

iPhone

नाविन्यपूर्ण फीचर्स, डिझाईन आणि खास तंत्रज्ञानामुळे अ‍ॅपलच्या (Apple) आयफोनचा (iPhone) चाहता वर्ग मोठा आहे. सध्या अ‍ॅपलच्या आयफोन 13 (iPhone 13) सीरिजला युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.अ‍ॅपलचा आयफोन 14 (iPhone 14) सप्टेंबर 2022 ला बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

आयफोनच्या आतापर्यंतच्या सीरिजपेक्षा हा फोन काहीसा वेगळा आणि अधिक उपयुक्त असेल, अशी चर्चा आहे. कोणत्याही स्मार्टफोनसाठी सेल्युलर नेटवर्क ही महत्त्वाची गरज आहे. नेटवर्कविना फोनचा वापर होऊ शकत नाही. अगदी आपत्कालीन स्थितीत सेल्युलर नेटवर्क (Cellular Network) नसेल तर जवळचा फोनही निकामी ठरतो.

नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत अ‍ॅपल आयफोन 14(iPhone 14) मध्ये एक विशेष फीचर देईल अशी चर्चा आहे. आयफोन 14 च्या युजरना आपत्कालीन स्थितीत मदत मिळावी यासाठी या फोनमध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी (Satellite Connectivity) देण्यात येईल. ही सुविधा दुर्गम तसंच ज्या भागात नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, अशा युजर्ससाठी फायदेशीर ठरेल. `लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉम`ने याविषयीची माहिती दिली आहे.

अ‍ॅपलच्या आयफोनची प्रत्येक सीरिज वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्येक सीरिजमध्ये नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश असतो. आयफोन 13 सध्या जोरदार चर्चेत आहे. आता युजर्सला आयफोन 14(iPhone 14) सीरिजची प्रतीक्षा आहे.

या सीरीजमध्ये अ‍ॅपल सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी सुविधा देणार असल्याची चर्चा आहे.अ‍ॅपल आयफोन 14 सीरिज अंतर्गत चार मॉडेल्स लॉंच करण्याची शक्यता आहे. यात आयफोन 14, आयफोन 14 प्रो, आयफोन 14 प्रोमॅक्ससह अजून एका मॉडेलचा समावेश असेल. या सीरिजमध्ये मिनी मॉडेलचा (Mini Model) समावेश नसेल अशी देखील अफवा आहे. यावेळी कंपनी मिनी मॉडेलऐवजी अजून एखादा मॅक्स व्हेरियंट (Variant) लॉंच करण्याची शक्यता आहे.

आयफोन 14 मध्ये कॅमेरात कोणताही मोठा अपग्रेड नसेल. आयफोन 14(iPhone 14) मध्ये 12 मेगापिक्सलचा सेन्सर असण्याची शक्यता आहे. हा कॅमेरा आयफोन 11, आयफोन 12 आणि आयफोन 13 या मॉडेल्समध्ये होता. प्रो-मॉडेलमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर असण्याची शक्यता आहे.

आयफोन 14 च्या मॉडेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसर (Processer) असतील असं अनुमान लावण्यात येत आहे. त्यापैकी दोन मॉडेल्समध्ये A16 प्रोसेसरचा वापर होऊ शकतो. हा A15 प्रोसेसरचा रिब्रँडेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे. हा प्रोसेसर आयफोन 13 मध्ये वापरला गेलेला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर सध्या चीपचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. त्यामुळे अ‍ॅपल A15 पासून A16 चीप रिब्रँड करण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीला आवश्यक असलेल्या सर्व A16आणि M2 चिप्सच्या निर्मितीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं काही रिपोर्ट्समधून स्पष्ट झालं आहे. हे ही Smartphone : तुमचा स्मार्टफोन हरवलाय का?

‘या’ ट्रिक्स वापरून येईल शोधता आयफोन 14 मधल्या बहुचर्चित सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर बाबतीत एक महत्त्वाची माहिती ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी शेअर केली आहे. आपल्या अहवालात मार्क म्हणतात, आयफोन 14 ग्रामीण भागातल्या सॅटेलाईट नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी सॅटलाईट कनेक्टिव्हिटी फीचरचा वापर करेल. मागील वर्षी देखील आयफोन 13 सीरिज लॉंच होण्यापूर्वी असाच एक रिपोर्ट समोर आला होता. परंतु, त्यातील अंदाजांनुसार असं काहीच झालं नाही.

आयफोन 14 मधील सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी फीचरमुळे युजर्स सॅटेलाइट नेटवर्कशी जोडले जातील, असं गुरमन यांनी म्हटलं आहे. आयफोन 14 मध्ये `इमर्जन्सी मेसेज व्हाया कॉन्टॅक्ट्स` असा ऑप्शन असेल. यामुळे युजर्सला सेल्युलर सेवा उपलब्ध नसतानाही एक छोटा मेसेज शेअर करता येईल. आयफोन 14 सप्टेबर 2022 रोजी लॉंच होण्याची शक्यता आहे. या फोनने ट्रायल प्रॉडक्शनमध्ये प्रवेश केला असल्याचं अहवालांवरून स्पष्ट होतं.

Smart News:-

पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण


‘मी त्यांच्याकडे पाहातच नाही !’, आदित्य ठाकरेंचा टोला


विद्यार्थ्यांनो, लवकरच जारी होणार ICSE परीक्षेचं हॉल तिकीट


राज ठाकरेंनी भोंग्यांऐवजी विकासाच्या मुद्दावर बोलाव; -भाजप उपाध्यक्ष


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *