बचतच बचत… Airtel पेक्षा ६० रुपये स्वस्त आहे Jio चा हा प्लॅन!

Bharti Airtel आणि Reliance Jio दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना 1GB दैनंदिन डेटासह काही प्रीपेड प्लॅन्स (prepaid plans) ऑफर करतात. हे प्लॅन अशा लोकांसाठी आहेत ज्यांचा डेटा वापर जास्त नाही. असे प्लॅन्स दीर्घ किंवा मध्यम कालावधीसाठी उपलब्ध नाहीत.

कंपनी आपल्या ग्राहकांना 1GB दैनंदिन डेटा प्लॅन अल्प मुदतीसाठी ऑफर करते. तर मग जाणून घेऊया 1GB डेली डेटा प्लॅनमध्ये कोणत्या कंपनीचा प्लान चांगला आहे.

Airtel 1GB डेटा प्लॅन
Bharti Airtel चा बेस 1GB दैनंदिन डेटा (prepaid plans) प्लॅनची किंमत 209 रुपये आहे. या प्लॅनची वैधता 21 दिवसांची आहे आणि यूजर्सना या प्लानमध्ये एकूण 21GB डेटा मिळतो. यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात येते. याशिवाय ग्राहकांना Airtel Thanks चे फायदे देखील मिळतात. या फायद्यांमध्ये Amazon Prime Video मोबाइल एडिशनचं एका महिन्यांचं सबस्क्रिप्शन, मोफत HelloTunes आणि मोफत Wynk Music यांचा समावेश आहे.

Reliance Jio 1GB डेटा प्लॅन
रिलायन्स जिओ 149 रुपयांमध्ये 1GB दैनंदिन डेटा प्लॅन ऑफर करते. हा प्लान 20 दिवसांच्या वैधतेसह येतो म्हणजेच ग्राहकांना यात एकूण 20GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देण्यात येता. यासह, जिओच्या प्लॅनमध्ये JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity चे सबस्क्रिप्शनदेखील देण्यात येते. दोन्ही कंपन्यांचे प्लॅन्स जवळपास सारखेच आहेत.

कोणता प्लॅन बेस्ट?
एअरटेलच्या प्लॅन सोबत ग्राहकांना 9.95 रुपयांमध्ये 1GB डेटा मिळतो. तर जिओच्या प्लॅनमध्ये 7.45 रुपयांमध्ये 1GB डेटा मिळतो. एअरटेलच्या तुलनेत जिओचा प्लॅन स्वस्तही आहे.

हेही वाचा :


सोनं आज पुन्हा स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *