करोडो Chrome युजर्स धोक्यात! Google कडून इशारा..!

गुगल क्रोम Google Chrome हे अतिशय लोकप्रिय इंटरनेट ब्राउझर आहे. जगभरात गुगल क्रोमचे अब्जावधी युजर्स आहेत.आता गुगलने क्रोम युजर्ससाठी इशारा जारी केला आहे. गुगल क्रोममध्ये एक नवीन त्रुटी आढळली आहे. त्यामुळे गुगल क्रोमचे जवळपास 320 कोटी युजर्स धोक्यात आले आहेत.
गुगल क्रोममध्ये एक नवीन झिरो-डे हाय थ्रेट लेव्हल हॅक आढळला आहे. यासंदर्भात एका नवीन क्रोम ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. क्रोमच्या सुरक्षेचा भंग करून हॅकर्स युजर्संना टारगेट करू शकतात, असा इशारा गुगलने दिला आहे. दरम्यान, कंपनीने याचे फिक्स जारी केले आहे. Windows, macOS, Linux आणि Android सारख्या क्रोमच्या सर्व प्लॅटफॉर्मवर ही त्रुटी आढळली आहे.(google chrome)
क्रोम युजर्सच्या सुरक्षेसाठी, गुगलने अद्याप या धोक्याची डिटेल्स माहिती दिलेली नाही. क्रोमच्या कंपोनेंट V8 ला झिरो-डे हॅकद्वारे उल्लंघन होण्याची तीन आठवड्यांतील ही दुसरी वेळ आहे. या त्रुटीचा सामना करण्यासाठी गुगलने क्रोमचे नवीन व्हर्जन (100.0.4896.127) जारी केली आहे. परंतु, हे ताबडतोब सर्वांना उपलब्ध होणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
अपडेट्स मॅन्युअली तपासण्यासाठी युजर्स क्रोमच्या टॉप राइटला असलेल्या थ्री-डॉट मेनूवर क्लिक करू शकतात. यानंतर यूजर्सला सेटिंगमध्ये जावे लागेल. सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, तुम्हाला हेल्प विभागात जावे लागेल. त्यानंतर About Google Chrome वर टॅप करावे लागले. हे केल्यानंतर तुमचा ब्राउझर रीस्टार्ट करा.
दरम्यान, या वर्षी मार्चमध्ये गुगलने मान्य केले होते की क्रोम आणि इतर ब्राउझरवर होणारे सक्सेसफुल झिरो-डे हॅक वाढत आहेत. यामध्ये युजर्सना सांगण्यात आले की ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी त्यांना प्रो-अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. याशिवाय ब्राउझरचे अपडेट्स वेळोवेळी तपासत राहा.
हेही वाचा :