Jio-Airtel ला जोरदार टक्कर ;’या’ कंपनीचा धाकड plan !

Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच त्यांच्या प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. यूजर्सच्या समस्या लक्षात घेऊन तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी कमी किमतीचे स्वस्त प्लान लॉन्च केले आहेत. कारण प्रत्येक यूजर्सला कमी किंमतीत अधिक फायदे मिळणे आवडते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्याची एक वर्षाची वैधता 150 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लानने रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या सर्व मोठ्या खासगी टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. जाणून घेऊया या प्लानबद्दल…(mtnl broadband)

MTNLचा सर्वात स्वस्त प्लान
MTNL (mtnl broadband) ची 365 दिवसांची वैधता असलेली एक धमाकेदार योजना आहे. त्याची किंमत 141 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला हाय-स्पीड डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचे फायदे दिले जात आहेत.

एमटीएनएल योजनेचे फायदे
141 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांसाठी अनेक फायदे दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये पहिल्या 90 दिवसांसाठी दररोज1 जीबी डेटा दिला जाईल, त्यासोबतच एमटीएनएल नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.

200 मिनिटे मोफत मिळतील
जर तुम्हाला इतर कोणत्याही नेटवर्कवर कॉल करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 200 मिनिटे मोफत दिली जातील. ही मिनिटे संपल्यानंतर, तुम्ही 25 पैसे प्रति मिनिट दराने कॉल करू शकाल. हे शुल्क फक्त 90 दिवसांसाठी असेल. त्याचवेळी, 90 दिवसांनंतर, तुम्हाला प्रत्येक सेकंदासाठी 0.02 पैसे शुल्क द्यावे लागेल. Jio, Airtel आणि Vi ची कोणतीही कंपनी इतका स्वस्त वार्षिक प्लान ऑफर करत नाही.

हेही वाचा :


LIC IPO ने गुंतवणूकदारांना लावला 42500 कोटींचा चुना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *