आता आधारकार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं अनिवार्य

गेले काही दिवसांपूर्वीचं आयकर विभगाने(Income Tax ) आधार कार्ड पॅनकार्डास लिंक करण्याबाबत माहिती जारी केली होती. तरी तुम्ही अजूनही तुमचे आधार कारड पॅनकार्डास लिंक केले नसाल तर आता तुम्हाला त्याचे मोठे परिणाम भोगावे लागणार आहेत.
आधार कार्डचा वापर तुम्ही तुमचं ओळखपत्र म्हणून करता अनेक ठिकाणी प्रवेशासाठी, परिक्षा, शिक्षण, प्रवास, व्यवहारासह विविध बाबींसाठी आधारकार्ड महत्वाचं आहे. तसेच बॅंकींग, पगार, आर्थिक व्यवहार, कर्ज अशा अनेक गोष्टींसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. पण आता आयकर विभागाकडून हे दोन्ही कार्ड एकमेकांना लिंक करण्यासंबंधी सुचना दिल्या आहेत. एवढचं नाही तर तुम्ही हे दोन्ही कार्डाना लिंक नकेल्यास ह्याचे तुमच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होणार असुन थेट हे कार्ड बाद होण्याची शक्यता आयकर विभागाकडून(Income Tax ) वर्तवण्यात आली आहे.
31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. जर 31 मार्च 2023 पर्यंत आधार आणि पॅन लिंक न केल्यास त्या आधारकार्ड आणि पॅनकार्ड धारकावर कारवाई करण्यात येईल असे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. त्यापूर्वी, लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड लिंक न केल्यास ते रद्द मानले जाईल. याचा अर्थ तुम्ही ते कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामात पुन्हा वापरू शकणार नाही.
तरी तुम्ही घरबसल्या तुमचं पॅनकार्ड तुमच्या आधारकार्डास लिंक करु शकता. आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भएट देवून तुम्ही आधार-पॅन लिंकींगची प्रक्रीया सहज पूर्ण करु शकता. आयकर ई-फायलिंग वेबसाइटच्या डाव्या बाजूला तुम्हाला Quick Links चा पर्याय त्यावर क्लीक केल्यास ‘Link Aadhaar’ पर्याय येईल. या पर्यायावर क्लीक केल्यास तुमच्या पुढे पॅन कार्ड, आधारकार्ड आणि नाव असे तिन ऑप्शन येतील. त्यात तुम्हाला अचुक माहिती भरावी लागेल. नंतर तुम्हाला तुमच्या रेजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर तुमचं आधारकार्ड लगेच तुमच्या पॅनकार्डला लिंक होईल.