१० रुपयांच्या पॅकमध्ये या युजर्सना मिळणार बरंच काही..!

vodafone idea

आता तुम्हाला कोणालाही एसएमएस पाठवण्यासाठी महागडे पॅक खरेदी करण्याची गरज भासणार नाही. कारण, Vi आपल्या युजर्सना एक भेट देत आहे. Vodafone Idea त्यांच्या युजर्सना टॉकटाइम पॅकवर एसएमएस पाठविण्याची परवानगी देखील देत आहे. खुद्द टेलिकॉम टॉकने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. अद्याप या संदर्भात कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती शेयर करण्यात आलेली नाही.

VI चे एसएमएस प्रीपेड पॅक Jio आणि Airtel त्यांच्या युजर्सना पुरवत असलेल्या एसएमएस सुविधेपेक्षा खूप महाग आहेत. कंपनीने आपल्या कमी उत्पन्न असलेल्या युजरसाठी (vodafone idea)च्या नेटवर्कवरून पोर्टिंगसाठी एसएमएस पाठवण्याची मर्यादा कमी केली होती. ही परिस्थिती पाहता, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने ऑपरेटर्सना एक आदेश जारी केला होता. ज्यामध्ये युजर्स एसएमएस प्रॉफिटसह प्रीपेड पॅकवर नसले तरीही त्यांना पोर्ट आउट एसएमएस पाठविण्याची परवानगी देण्यास सांगितले होते.

TelecomTalk ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘Vi युजर्स आता टॉकटाइम पॅकवर बँकेच्या OTP पडताळणीसाठी एसएमएस पाठवू शकतात. इतर टेलिकॉम कंपन्यांनी परवानगी दिली की नाही.. याबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही. पण, हे फीचर Vi युजर्ससाठी खरोखरच फायदेशीर ठरेल. युजर्स नियमित एसएमएस पाठवू शकतील.

vodafone idea

या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, १० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतरही Vi यूजर्स इतर यूजर्सना नियमित एसएमएस पाठवू शकतील. हे एक प्रकारचे पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे सेकंडरी नंबर म्हणून Vi SIM घेणार्‍या, परंतु बँक पडताळणी आणि इतर कारणांसाठी दुसरा क्रमांक वापरणार्‍या युजर्ससाठी हे आवश्यक होते. Vodafone Idea सह, तुम्ही १० रुपये किमीपासून पासून अनेक एसएमएस पॅक खरेदी करू शकता. Vi च्या १० रुपयांच्या पॅकसह, युजर्सना ७.४७ रुपयांचा टॉकटाइम देखील मिळेल.

Vodafone- Idea कडे इतरही काही जबरदस्त प्लान्स आहेत. Vodafone Idea कडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे २६९ रुपये, २९९ रुपये, ३५९ रुपये, ४०९ रुपये आणि ४७५ रुपये किंमतीचे प्लान्स उपलब्ध असून, यात क्रमशः १ जीबी, १.५ जीबी, २ जीबी, २.५ जीबी आणि ३ जीबी डेटा मिळतो. हे सर्व प्लान्स अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएससह येतो.

हेही वाचा :


‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’,राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *