12GB RAM आणि 150W फास्ट चार्जिंग असलेला OnePlus 10R

OnePlus

OnePlus 10R 5G स्मार्टफोनची खासियत म्हणजे 150W फास्ट चार्जिंग. हा दमदार स्मार्टफोन आता डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

अ‍ॅमेझॉनवर हा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही 12GB RAM, 50MP कॅमेरा आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. चला जाणून घेऊया ऑफर्स.

OnePlus 10R 5G Price & Offer

OnePlus 10R 5G च्या 8GB RAM (80W) व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे आणि 12GB RAM (80W) व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. Amazon Sale मध्ये ICICI बँकेच्या कार्डच्या मदतीनं 4000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. त्यामुळे फक्त 34,999 रुपयांमध्ये 150W फास्ट चार्जिंग असलेला डिवाइस घेऊ शकता.

OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसिंगसाठी कंपनीनं मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेटचा वापर केला आहे. एआयनाही मीडियाटेक एपीयू 580 आणि ग्राफिक्ससाठी माली-जी610 जीपीयू आहे. हा अँड्रॉइड 12 बेस्ड आक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी 3D Passive Cooling System आणि HyperBoost Gaming Engine असे फीचर्स देखील आहेत.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 10आर स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

वनप्लस 10आर स्मार्टफोन 6.7 इंचाचा फ्लुइड अ‍ॅमोलेड डिस्प्लेहं बाजारात आला आहे. ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1000हर्ट्ज रिस्पांस रेट मिळतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा डिवाइस कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. तसेच 394पीपीआय, 10बिट कलर एचडीआर10+ इत्यादी फीचर्स देखील आहेत.

वनप्लस 10आर च्या एका मॉडेलमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. जी 32 मिनिटांत फुल चार्ज होते. तर 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500एमएएच बॅटरी असलेला आणखी एक मॉडेल सादर करण्यात आला आहे. जो फक्त 5 मिनिटांत 50 टक्के तर 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो.

Smart News:-

बंडखोर आमदारांची पहिली पसंत ‘भाजप’, 5 वर्षांत तब्बल 182 जणांनी घेतलीय शरण


चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल


सोनिया गांधींनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी मागितला वाढीव वेळ


विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे अनुदान – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड


Leave a Reply

Your email address will not be published.