कोणत्याही भारतीय कार्डने पेमेंट होणार नाही!

अॅप्पलने आपलं अॅप स्टोअर आणि इतर सबस्क्रिप्शन सेवांसाठी भारतीय डेबिट आणि क्रेडीट कार्ड्सच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणं थांबवलं आहे. अॅपलने नुकतंच सांगितलं की भारतातून पेमेंट करायचं असेल तर युजर्सना भारतीय डेबिट, क्रेडीट कार्ड (card payment) वापरता येणार नाही. अॅप स्टोअर किंवा सबस्क्रिप्शन घेण्यासाठी भारतीय युजर्सना इतर पर्याय निवडावे लागतील.

गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय युजर्सना पेमेंट करताना अडचणी येत होत्या. त्यांच्याकडे असलेल्या कार्ड्सचा वापर त्यांना करता येत नव्हता. त्यानंतर अॅपलने आपली भूमिका स्पष्ट केली. भारतीय डेबिड, क्रेडिट कार्ड (card payment) वापरता येत नसले तरी अॅपल युजर्सना अॅपल आयडी बॅलन्सच्या माध्यमातून या सेवा वापरता येणार आहे. तसंच नेट बँकिंग, युपीआय, अॅप स्टोअर कोड हे पर्यायही सुरू आहेत.

भारतीय रिझर्व बँकेने आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डविषयक धोरणांमध्ये बदल केल्याने अॅपलने हा निर्णय घेतला आहे. सायबर फसवणूक आणि इतर आर्थिक गुन्ह्यांपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाच प्रकारचे बदल नेटफ्लिक्सनेही केले आहेत.

हेही वाचा :


अभिनेत्रीची गोवा वारी! हॉट पिंक मॉर्निंग ब्युटी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *