Realme Book Prime भारतात लाँच, इतकी आहे किंमत

Realme Book Prime

आजचा दिवस रियलमी फॅन्ससाठी खूप महत्वाचा होता. कंपनी एक-दोन नव्हे तर पाच डिवाइस भारतीय बाजारात उतरवले आहेत. कंपनीनं दोन स्मार्टफोन्स तर सादर केले आहेत. परंतु सोबत Realme Book Prime लॅपटॉप देखील सादर केला आहे. यात 16GB RAM, 512GB स्टोरेज, Windows ११, 2K डिस्प्ले आणि 11th Gen Intel Core i5-11320H प्रोसेसर देण्यात आला आहे.

Realme Book Prime ची किंमत

या नव्या रियलमी लॅपटॉपची किंमत 64999 रुपयांपासून सुरु होते. परंतु लाँच ऑफर अंतगर्त हा लॅपटॉप 57999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच एचडीएफसी बँकेच्या कार्डवर ग्राहकांना 3,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. हा लॅपटॉप 13 एप्रिलपासून कंपनीच्या वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

Realme Book Prime चे स्पेसिफिकेशन्स

Realme Book Prime लॅपटॉपमध्ये 14.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तर प्रोसेसिंगसाठी रियलमीनं 11th Gen Intel Core i5-11320H प्रोसेसर दिला आहे. सोबत 16GB पर्यंत RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळते. या लॅपटॉपमधील बॅटरी सिंगल चार्जमध्ये 12 तासांचा बॅकअप देऊ शकते, कंपनीनं यात 65W फास्ट चार्जिंगसह यूएसबी सी पोर्ट दिला आहे.

या लॅपटॉपमध्ये DTS ऑडियो टेक्नॉलॉजी असलेले स्टीरियो स्पिकर मिळतात. बॅकलिट कीबोर्डसह ड्युअल फॅन लिक्विड कूलिंग सिस्टम देखील मिळते. Realme Book Prime मध्ये कनेक्टिविटीसाठी WiFi 6 आणि थंडरबोल्ट 4 पोर्ट देण्यात आले आहेत. 14.9mm सुपर स्लिम लॅपटॉपचं वजन 1.37 किलोग्राम आहे.

 

Smart News:-

तू तेव्हा तशी: वल्लीने आखला मोठा प्लॅन; सौरभला सोडावे लागणार वाड्यावरचे हक्क?


OnePlus च्या 5G फोनवर मिळतेय 14,500 रुपयांची सूट, स्टॉक संपण्याआधी करा बुक


राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचे ठिकाण ठरले! ९ तारखेला पुन्हा धडाडणार तोफ


पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *