‘या’ प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता व दररोज मिळणार 2GB डेटा !

हल्ली मोबाईल फोनवर बोलणे सुद्धा महागले आहे. त्यासाठी प्रत्येक कंपन्या आपल्या (recharge offer) ग्राहकांना नवनवीन प्लान ऑफर करत असतात. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या गरजांनुसार अनेक योजना ऑफर करते.

कंपनीच्या काही योजना अगदी अनोख्या आहेत. (recharge offer) सध्या कंपनीला एकच समस्या आहे, ती म्हणजे 4G चा अभाव. पण, येत्या काही दिवसांत तेही दूर होणार आहे. सध्या आम्ही तुम्हाला ३९७ रुपयांच्या प्लानबद्दल सांगणार आहोत.

BSNL आपल्या ग्राहकांना 397 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता दिली जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा आणि दररोज 100SMS दिला जातो. या डेटा मर्यादेनंतर इंटरनेटचा स्पीड ४० केबीपीएस इतका कमी होतो.

मोफत डेटा आणि कॉलिंग व्यतिरिक्त, ग्राहकांना BSNL च्या या प्लॅनमध्ये लोकधुन कंटेंट आणि PRBT देखील मिळेल. पण, या प्लॅनमध्ये एक कॅच आहे की वैधता जरी 180 दिवसांची असली तरी उर्वरित सुविधा फक्त 60 दिवसांसाठी उपलब्ध असतील.

त्याचप्रमाणे बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंग देखील दिले जाते. ग्राहक लोकल, एसटीडी (ऑन-नेट आणि ऑफ-नेट) आणि नॅशनल रोमिंगमध्ये मोफत कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. दिल्ली आणि मुंबईतही (Mumbai) ग्राहकांना मोफत कॉलिंगचा लाभ मिळत राहील.

हेही वाचा :