Jio चे नवे Recharge Plan; वर्षभर करावा लागणार नाही रिचार्ज

अनेक टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) आपल्या ग्राहकांसाठी विविध रिचार्ज प्लॅन (recharge plan) लाँच करत असतात. परंतु अल्पावधीत रिलायन्स जिओ (Reliance Jio) देशातील नंबर वन प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी ठरली आहे. जिओचे परवडणारे रिचार्ज प्लॅन हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे. Jio ने नुकतेच आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही कमी किमतीत हाय-स्पीड डेटा (High Speed Data) मिळवू शकता.
Reliance Jio ने दोन नवे Recharge Plan लाँच केले आहेत. हे दोन्ही रिचार्ज प्लॅन(recharge plan)वर्षभराच्या वॅलिडिटीसह आहेत. हे प्लॅन्स कंपनीने वर्क फ्रॉम होम कॅटेगरीमध्ये (Work from Home Data Packs) लाँच केले आहेत. कंपनीने हे प्लॅन्स वेबसाइटवर अपडेटही केले आहेत.
2878 रुपयांचा Recharge Plan –
पहिला वर्क फ्रॉम होम डेटा प्लॅन 2,878 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये एक वर्ष अर्थात 365 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. दररोज 2GB हाय स्पीड इंटरनेट मिळेल. म्हणजेच एकूण या प्लॅनमध्ये 730GB इंटरनेट मिळेल. इतके GB संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होऊन 64Kbps केला जाईल. हा डेटा प्लॅन असल्याने यात कॉलिंग, SMS किंवा OTT चे फायदे दिले जाणार नाहीत.
आणखी एक नवा डेटा प्लॅन –
या डेटा प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेली डेटा दिला जाईल. हा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी करून 64Kbps होईल. दररोज 2.5GB डेटाच्या हिशोबाने या प्लॅनमध्ये एकूण 912.5GB डेटा मिळेल. या प्लॅनची वॅलिडिटीही 365 दिवस आहे. यातही डेटाशिवाय इतर कोणतेही बेनिफिट्स दिले जाणार नाहीत. हा डेटा प्लॅन 2,998 रुपयांचा आहे.
वर्क फ्रॉम होम कॅटेगरीमध्ये Jio चे आणखी तीन प्लॅन आहेत. याच्या किमती 181 रुपये, 241 रुपये आणि 301 रुपये आहेत. 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30GB डेटा, 241 रुपयांच्या प्लॅनमध्ये 40GB इंटरनेट आणि 301 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये 50GB डेटा दिला जातो. या सर्व डेटा प्लॅनची वॅलिडिटी 30 दिवस आहे.
हेही वाचा :