भन्नाट प्लान! फक्त ७५ रुपयात मिळेल २८ दिवसांची वैधता..!

telecom company

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी (telecom company) असलेल्या Reliance Jio कडे स्वस्त प्लान्सची मोठी लिस्ट आहे. कंपनीकडे ग्राहकांसाठी जबरदस्त बेनिफिट्ससह येणारे शानदार प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स उपलब्ध आहेत. मात्र, कंपनीकडे काही प्रीपेड प्लान्स असे आहेत, जे केवळ JioPhone यूजर्ससाठी आहे. JioPhone हा कंपनीचा ४जी आणि VoLTE सपोर्टसह येणारा फीचर फोन आहे. हा फोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी कंपनीकडे (telecom company) खास प्लान्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या प्लान्सची किंमत देखील खूपच कमी आहे. कंपनीकडे २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे जिओफोन प्लान्स आहेत. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

JioPhone Prepaid Plans

या लिस्टमध्ये सर्वात स्वस्त प्लान ७५ रुपयांचा आहे. यामध्ये २३ दिवसांच्या वैधतेसह दररोज ०.१ जीबी डेटा मिळतो. तसेच, अतिरिक्त २०० एमबी डेटा मिळेल. अशाप्रकारे एकूण २.५ जीबी डेटा मिळतो. तसेच, एकूण ५० एसएमएस देखील मिळतील. कंपनीकडे ९१ रुपयांचा प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये देखील ७५ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे सर्व बेनिफिट्स दिले जात आहे. या प्लानचा कालावधी मात्र २८ दिवस आहे.

Jiophone चा १२५ रुपये आणि १५२ रुपयांचा प्लान

कंपनीकडे JioPhone यूजर्ससाठी १२५ रुपये आणि १५२ रुपये किंमतीचे दोन शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लान्समध्ये यूजर्सला दररोज ०.५ जीबी डेटाचा फायदा मिळेल. तसेच, एकूण २०० एसएमएस मिळतात. कंपनीच्या १२५ रुपयांच्या प्लानची वैधता २३ दिवस आहे. अशाप्रकारे प्लानमध्ये एकूण ११.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो. तर १५२ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. अशाप्रकारे, या प्लानमध्ये एकूण १४ जीबी डेटा दिला जातो. या दोन्ही जिओफोन प्रीपेड प्लान्समध्ये यूजर्सला देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा दिली जात आहे.

telecom company

Jiophone चा १८६ रुपयांचा प्रीपेड प्लान

जिओकडे Jiophone यूजर्ससाठी १८६ रुपयांचा प्रीपेड प्लान देखील आहे. १८६ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे संपूर्ण कालावधीसाठी एकूण २८ जीबी डेटा मिळेल. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. कंपनीकडे JioPhone यूजर्ससाठी दररोज १ जीबी डेटासह येणारा एकच प्लान आहे. कंपनीकडे २२२ रुपयांचा शानदार प्रीपेड प्लान देखील उपलब्ध असून, याची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे. अशाप्रकारे, प्लानमध्ये एकूण ५६ जीबी डेटाचा फायदा मिळेल. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात.

हेही वाचा :


भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकसंघपणे काम करेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *