मोबाईल ऍपद्वारे कर्ज देणाऱ्या कंपन्यांना RBI चा जबर दणका!

mobile app

भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांवर (NBFC) मोठी कारवाई केली असून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या NBFC चा परवाना RBI ने रद्द केला. ज्या कंपन्यांचे परवाने रिझव्‍‌र्ह बँकेने रद्द केले आहेत ते ऍपद्वारे(mobile app) कर्ज देत होत्या.

या कंपन्यांवर कारवाई
यूएमबी सिक्युरिटीज लिमिटेड, अनाश्री फिनवेस्ट, चढ्ढा फायनान्स, अॅलेक्सी ट्रेकॉन आणि जुरिया फायनान्शियल सर्व्हिसेसचे वाने रद्द करण्यात आल्याचे RBIकडून सांगण्यात आले. या कंपन्या वेगवेगळ्या अॅपच्या (mobile app)माध्यमातून ग्राहकांना कर्ज देत असत.

हे ऍप बंद
RBI ने बंदी घातलेल्या या ऍपमध्ये Mrupee, Kush Cash, flycash, Moneed, wifi कॅश यांसारख्या लोन मोबाईल ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे. UBM सिक्युरिटीज फास्टऍप टेक्नॉलॉजी नावाच्या ऍपद्वारे कर्ज देत असे. अनश्री फिनव्हेस्ट Mrupee, Kush Cash, Karna Loan flycash या मोबाईल ऍपद्वारे कर्ज देत असे.

दिल्लीस्थित चड्ढा फायनान्स wifi कॅशच्या मोबाइल ऍपद्वारे कर्ज देत असे. Alexei Tracon सेवा Badabro Giga म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे झुरिया फायनान्शिअल Momo, Moneed, Cash Fish, kredipe, Rupee Master, Rupeeland या ऍप्सद्वारे कर्ज प्रदान करीत होते.

हेही वाचा :


हृदयद्रावक! पंचगंगेतील एका सुळकीने सचिनचं आयुष्य संपवल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *