झटका! Airtel, Jio आणि VI या टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज महागणार!

टेलिकॉम कंपन्या (telecom companies) लवकरच ग्राहकांना आणखी एक झटका देऊ शकतात. कंपन्या प्रीपेड टॅरिफच्या किमती वाढवू शकतात. देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) पुन्हा एकदा टॅरिफ वाढवू शकतात.
यावर्षी आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपन्यांच्या टॅरिफ वाढवणार आहेत. ज्यामुळे आर्थिक वर्ष 2023 मध्ये महसूली वाढ 20-25 टक्के इतकी होऊ शकते.
रेटिंग एजेंसी Crisil च्या रिसर्च फर्मच्या मते कोणत्याही इंडस्ट्रीसाठी सरासरी महसूल वाढवणे नवीन गुंतवणूकीसाठी गरजेचे असते. असं न केल्यास वापरकर्त्यांना दर्जेदार सेवा मिळणं कठीण होतं.
अनेक वर्षांपासून Jio च्या लो-प्राइसिंगशी स्पर्धा केल्यानंतर गेल्या काही काही वर्षात टेलिकॉम कंपन्यांनी (telecom companies) टॅरिफ हाइक करणे सुरू केले.
किती वाढू शकतील किंमती ?
जीओ, एअरटेल, वी च्या महसूलात यावर्षी 20 ते 25 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. मागील आर्थिक वर्षात कंपन्यांच्या सरासरी महसूलात 5 टक्क्यांची वृद्धी नोंदवण्यात आली आहे. आता कंपन्या 15 ते 20 टक्क्यांची वृद्धीचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे कंपन्या या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहित आपल्या योजनांचे प्लॅन्स वाढवू शकतील.
एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टलने प्लॅन्सच्या किंमतींबाबत म्हटले की, या वर्षी टॅरिफ हाइकसाठी तयार राहायला हवे.
हेही वाचा :
Deepak Chahar : भारतीय क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात