संपूर्ण ३० दिवसांच्या वैधतेसह येतात Jio चे ‘हे’ भन्नाट प्लान्स..!

ट्रायने काही दिवसांपूर्वी टेलिकॉम कंपन्यांना (telecom companies) संपूर्ण महिन्याभराच्या वैधतेसह येणारे प्लान्स सादर करण्यास सांगितले होते. ट्रायच्या आदेशानंतर आता कंपन्या ३० आणि ३१ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स सादर करत आहे. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जियोने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लान्स सादर केले आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड पोर्टपोलियोमध्ये महिन्याभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सचा समावेश केला आहे. कंपनीकडे २५९ रुपये आणि २९६ रुपयांचे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये संपूर्ण महिन्याभराच्या वैधतेसह डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली आहे. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Reliance Jio चा २५९ रुपयांचा प्रीपेड प्लान

Reliance Jio कडे २५९ रुपयांच्या वैधतेसह येणारा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता संपूर्ण एक महिना म्हणजेच ३० दिवस आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच, देशभरात सर्व नेटवर्कवर (telecom companies) अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यूजर्सला दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. प्लानमध्ये जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Reliance Jio चा २९६ रुपयांचा प्रीपेड प्लान

जिओने आपल्या ग्राहकांसाठी २९६ रुपयांचा स्वस्त प्लान्स देखील आणला आहे. या प्लानची वैधता ३० दिवस आहे. या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सला कोणत्याही डेली लिमिटशिवाय २५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, दररोज १०० मोफत एसएमएस आणि देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. यूजर्सला जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

या प्लान्समध्ये मिळेल ३० दिवसांची वैधता

जिओच्या १९१ रुपये, २४१ रुपये आणि ३०१ रुपयांच्या प्लानमध्ये देखील यूजर्सला ३० दिवसांची वैधता दिली जात आहे. हे सर्व डेटा वाउचर आहेत. १८१ रुपयांच्या डेटा वाउचरमध्ये एकूण ३० जीबी डेटा मिळतो. तसेच, २४१ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ४० जीबी आण ३०१ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ५० जीबी डेटा मिळतो. दरम्यान, ट्रायच्या आदेशानंतर खासगी टेलिकॉम कंपन्या भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने देखील ३० व ३१ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स सादर केले आहेत.

हेही वाचा :


सिनेमांपासून दूर असलेली अभिनेत्री करते ‘हे’ काम,चर्चेला उधाण!

Leave a Reply

Your email address will not be published.