आता 28 नव्हे 31 दिवसांचा मिळणार रिचार्ज

रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल नंतर, आता दूरसंचार ऑपरेटर कंपनी (telecom company) व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) 30 आणि 31 दिवसांच्या वैधतेसह प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. ज्याची किंमत 327 आणि 337 रुपये आहे. हे प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतात. यामध्ये दररोज 2GB डेटा मिळतो, त्यामुळे युजर्सना महिन्यानुसार 56GB ते 62GB पर्यंत डेटा मिळतो.
TRAI (Telecom Regulatory Authority of India) ने दूरसंचार ऑपरेटर्सना किमान एक प्रीपेड प्लॅन (मंथ व्हॅलिडिटीसह) समाविष्ट करण्यास सांगितल्यानंतर, ऑपरेटर कंपनीने मासिक प्लॅन सुरू केले आहेत. यापूर्वी जिओने मासिक प्लॅन ऑफर केले होते. ज्याची वैधता 30 आणि 31 दिवसांची आहे. या प्लॅन्सचे त्याच तारखेला नूतनीकरण केले जाते. तसेच, त्यांना कॅलेंडर महिना वैधता योजना (Calendar month validity plan) असेही म्हणतात.
Vodafone Idea चे नवीन प्लॅन
Vodafone Idea चा 327 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्लॅन दररोज 100 एसएमएससह एकूण 25GB डेटा ऑफर करतो. प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. यासह, प्रीपेड प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, Vi Movies आणि टीव्ही सबस्क्रिप्शनची मोफत मेम्बरशिप देतो. प्रीपेड प्लॅन मोठी व्हॅलिडिटी ऑफर करत असताना, यात दैनंदिन डेटाचा लाभ मिळत नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 25GB डेटा मिळेल.
त्याचप्रमाणे, Vodafone Idea telecom company चा 337 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 31 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. प्रीपेड प्लॅन दररोज 100 SMS सह एकूण 28GB पर्यंत डेटा ऑफर करतो. यासह, प्रीपेड प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, Vi Movies आणि टीव्ही सबस्क्रिप्शनची मोफत मेंबरशिप देतो. हा प्रीपेड प्लॅन दैनिक डेटा देत नाही ही बाब युजर्ससाठी निराशाजनक असू शकते.
रिलायन्स जिओने गेल्या आठवड्यात एक नवीन प्रीपेड प्लॅन ऑफर केला आहे. कंपनीने हा प्लॅन ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी’ (Calendar Month Validity) या टॅगलाइनसह लॉन्च केला आहे. त्याची किंमत 259 रुपये आहे. युजर्सना यात एका कॅलेंडर महिन्यासाठी अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवस आणि 31 दिवसांची वैधता.
कंपनीने दावा केला आहे की संपूर्ण महिन्याच्या वैधतेसह प्लॅन सादर करणारी जिओ ही देशातील पहिली टेलिकॉम कंपनी आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5GB डेटा, 100 SMS/दिवस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. विशेष म्हणजे आता एका वर्षात रिचार्जची संख्या फक्त 12 असेल. पूर्वी 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये युजर्सना एका वर्षात 13 रिचार्ज करावे लागत होते.
हेही वाचा :