‘ही’ कंपनी ग्राहकांना अगदी मोफत देतेय iPhone;

iPhone

स्मार्टफोन (Smartphone) हल्ली सर्वांकडे असतो. परंतु, अँड्रॉइड फोन घेण्यापेक्षा अनेकांना आयफोन घेण्याची इच्छा जास्त असते. या iPhone च्या किमती सामान्य माणसाला परवडणाऱ्या असतीलच असं नाही. त्यामुळे अनेक जण फोनसाठीच्या ऑफर्सची आतुरतेने वाट पाहत असतात. USA मध्ये राहणाऱ्यांसाठी iPhone 12 वर एक भन्नाट ऑफर मिळत आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; मात्र व्हेरिझॉन (Verizon) ही अमेरिकन टेलिकॉम कंपनी Apple आयफोन अगदी मोफत देत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे.

व्हेरिझॉन नावाची कंपनी 699 डॉलर (53,076 रुपये) किमतीचा iPhone 12 अगदी मोफत देत आहे; मात्र ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. iPhone 12 हे मॉडेल ऑक्टोबर 2020 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. यामध्ये 6.1 इंच सुपर रेटिना OLED डिस्प्ले आहे. हा 1200 निट्स पीक ब्राइटनेससह येतो.

यात Apple A14 बायोनिक SoC चिपसेट आहे. या स्मार्टफोनमध्ये 12MP प्रायमरी शूटर आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्ससह ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या फोनच्या समोरच्या बाजूला 12MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. यामध्ये फेसआयडी, हॅप्टिक फीडबॅक, मॅगसेफ वायरलेस चार्जिंग आणि इतरही अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.

या आहेत अटी

व्हेरिझॉन या अमेरिकन टेलिकॉम कंपनीने USA मध्ये राहणाऱ्यांसाठी iPhone 12 वर ही एक भन्नाट ऑफर लागू केली आहे. ही ऑफर केवळ 64GB व्हॅरिएंटच्या मोबाइल फोनसाठी उपलब्ध आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला 699 डॉलर किमतीचा iPhone 12 64GB मोफत मिळेल; मात्र यासाठी व्हेरिझॉनचा 36 महिन्यांचा ऑनलिमिटेड प्लॅन खरेदी करावा लागेल. तसंच या अनलिमिटेड प्लॅनसोबत एक नवीन व्हेरिझॉन कनेक्शन घ्यावं लागेल.

यामध्ये चार कनेक्शन असलेल्या व्हेरिझॉन अनलिमिटेड प्लॅन्सची सुरुवात दरमहा 30 डॉलरने (2,277 रुपये) होते. या ऑफरमध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G प्लॅन आणि iPhone 12 हे दोन्ही 30 डॉलर दरमहा या किमतीत मिळू शकतात. मात्र ही ऑफर मिळवण्यासाठी व्हेरिझॉनसोबत 36 महिन्यांचा कालावधी असलेला कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल. या कॉन्ट्रॅक्टनुसार, 36 महिन्यांच्या संपूर्ण काळासाठी तुम्हाला प्लॅन सुरू ठेवावा लागेल. तुम्ही हा प्लॅन बंद करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला iPhone 12 ची उर्वरित किंमत एकाच वेळी कंपनीला परत करावी लागेल, अशी अट घालण्यात आली आहे.

 

Smart News:-

राज ठाकरेंना अटक करा; अबू आझमींची मागणी


शरद पवारांचे शेवटचे वाईट दिवस सुरू; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य


एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन


टेरर फंडिंग प्रकरणी कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला 31 वर्षांची शिक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *