नया है यह, व्हॉट्सऍपवर नव्या फीचरचा धमाका!

युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सऍप नवनवीन फीचर (whatsapp new feature) सातत्याने आणत आहे. आताही व्हॉट्सऍप युजर्स फ्रेंडली असे काही फीचर आणले आहेत. त्यामध्ये प्रोफाईल फोटो, लास्ट सीन लपवणे, ग्रुप कॉलिंगवर एखाद्याला म्यूट करणे आदी नवीन फीचरचा समावेश आहे.

प्रोफाईल फोटो लपवा
आपला प्रोफाईल फोटो सर्वांना दिसू नये, असे अनेक युजर्सला वाटत असते. म्हणूनच (whatsapp new feature) व्हॉट्सऍपवरील आपला प्रोफाईल फोटो, लास्ट सीन अशी वैयक्तिक माहिती किती लोकांना दाखवायची किंवा किती लोकांपासून दडवून ठेवायची यासाठी व्हॉट्सऍपने एक नवीन फीचर आणले आहे. ऍण्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या फीचरच्या मदतीने युसर्जना त्यांचा खासगीपणा अधिक जपता येणार आहे.

सध्या व्हॉट्सऍपवर एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट आणि नोबडी हे तीन पर्याय उपलब्ध होते. या पर्यायांचा वापर करून प्रोफाईल फोटो कोण बघेल, हे ठरवू शकतो. नव्या फीचरमध्ये माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट हा आणखी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार काही ठरावीक लोकांना आपला प्रोफाईल फोटो आणि लास्ट सीन पाहण्यासाठी मर्यादित करता येणार आहे.

ग्रुप कॉलिंगवर घ्या मीटिंग
व्हॉट्सऍपने नुकतेच ग्रुप कॉलिंगमध्ये व्हॉईस म्यूटचे फीचर आणलंय. त्यानुसार ग्रुप व्हॉईस कॉलिंगच्या होस्टला एखाद्या व्यक्तीचा आवाज म्यूट करता येणार आहे. तसेच ग्रुप कॉलिंगदरम्यान एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवता येणार आहे. त्यामुळे झूम, गुगल मीटसारखी व्हॉट्सऍप ग्रुपवर मीटिंग घेणे शक्य होणार आहे. नेटवर्क नसेल तर मोबाईलवर मिस्ड कॉल ऍलर्टची सुविधा टेलिकॉम कंपन्यांकडून पुरवली जाते. त्याचप्रमाणे लवकरच व्हॉट्सऍप कॉलिंगसाठीही मिस कॉल ऍलर्ट उपलब्ध होणार आहे. याबाबतची चाचणी कंपनीकडून सुरू असून सुरुवातीला आयएसओ प्लॅटफॉर्मवरील युजर्सना ही सुविधा मिळेल.

नवे फीचर
व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला ऍड करण्याचे काम ऍडमिन करतो किंवा इन्व्हाईट हायपरलिंकद्वारे त्याला थेट सहभागी होता यायचे. त्यामुळे ग्रुपमध्ये अनावश्यक लोकांची गर्दी वाढते. ही बाब लक्षात घेता व्हॉट्सऍपच्या आगामी नव्या फीचरमध्ये लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला ऍडमिनकडे रिक्वेस्ट पाठवता येणार आहे.

हेही वाचा :


कारवाईच्या धमकीनंतर शिंदे गट आक्रमक…

Leave a Reply

Your email address will not be published.