नेटफ्लिक्सच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी..!
नेटफ्लिक्स (netflix)युझर्सकरता मोठी बातमी. मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सच्या प्लानमध्ये मोठे बदल झाले आहे. कुटुंबाबाहेरच्या लोकांना नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करण्यावर आता कंपनी अतिरिक्त शुल्क आकारणार आहे.
कंपनी सध्या एकत्र राहणाऱ्या लोकांना त्यांचे (netflix)अकाऊंट शेअर करण्याची परवानगी देते. मात्र, या योजनेमुळे अकाऊंटमुळे कधी आणि कसे शेअर करता येईल याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
कंपनीने सांगितले की, यामुळे नवीन सामग्रीमध्ये गुंतवणूक करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे.
भारतात नेटफ्लिक्सच्या प्लानची किंमत स्वस्त
नेटफ्लिक्स इंडियाने नुकतेच भारतात त्याच्या सब्स्क्रिप्शन प्लॅनच्या किमतीत कपात केली आहे. भारतातील ऍमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टारशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
कंपनीने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमती कमी केल्या आहेत, ज्यात फक्त मोबाईल प्लॅनचा समावेश आहे. स्ट्रीमिंग दिग्गज Netflix च्या मोबाईलची किंमत आता 149 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे, जी आधी 199 रुपये होती.
सर्वप्रथम, मोबाईल प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ते 199 रुपयांवरून 149 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे, तर बेसिक प्लॅन 499 रुपयांऐवजी 199 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
त्याचा स्टँडर्ड प्लान 649 रुपयांवरून 499 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. शेवटी, त्याचा प्रीमियम प्लॅन 799 रुपयांऐवजी 649 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, कंपनीने अनधिकृत युझर्सना इतरांच्या अकाऊंटशी छेडछाड करण्यापासून रोखण्यासाठी खाते पडताळणी वैशिष्ट्याचा प्रयोग केला.
परंतु “अतिरिक्त सदस्य जोडा” आणि “ट्रान्सफर प्रोफाइल” वैशिष्ट्ये आणणे हे सूचित करते की नेटफ्लिक्स कंपनीचा सदस्य संख्या कमी होत असताना ती कशी वाढू शकते याबद्दल धोरणात्मक विचार करत आहे.
हेही वाचा :