Coding म्हणजे काय आणि कशी करतात?

कोडिंग म्हणजे संगणकाला हवे तसे वागवण्यासाठी वापरली जाणारी संगणकीय भाषा. Code ची प्रत्येक ओळ संगणकासाठी निर्देशांचा एक संच आहे. कोडचा एक संच एक स्क्रिप्ट तयार करतो आणि एक प्रोग्राम बनवतो. ह्यालाच कोडिंग असे म्हणतात. जेव्हा युजर एखादा सॉफ्टवेअर ओपन करतो, तेव्हा त्या युजर ला त्या सॉफ्टवेअर चा इंटरफेस दिसतो. पण कोडिंग ही त्या सॉफ्टवेअर च्या मागे केलेली असते. ही कोडिंग (coding classes) फक्त सॉफ्टवेअर बनवणारा व्यक्ती किंवा कंपनी पाहू शकते. कोणताही सामान्य माणूस पाहू शकत नाही.
जसं आपण कोणताही खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करतो. तसे एखादा ऍप किंवा सॉफ्टवेअर बनवण्यासाठी कोडिंग चा वापर केला जातो. कोडिंग म्हणजेच प्रोग्रामिंग लँग्वेज. कोडिंग लाच प्रोग्रामिंग असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही गोधळून नका जाऊ. कोडिंग ही कॉम्प्युटर ची भाषा आहे, ज्याचा वापर करून आपण सॉफ्टवेअर किंवा इतर ऍप्लिकेशन बनवू शकतो.
कोडिंग ही वेगवेगळ्या कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये केली जाते. जसे की Java, C++, Python, C#, HTML, ह्या सर्व कोडिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषा आहेत. सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट बनवण्यासाठी खूप कोडिंग करावे लागते. हे बनवलेले कोडिंग फाईल्स मध्ये तयार केले जाते. कोडिंग फाइल लाच प्रोग्राम फाइल्स असे सुद्धा म्हणतात.
कोडिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग भाषा
C coding classes
ही प्रोग्रामिंग भाषा शिकण्यासाठी सरळ आणि सोपी आहे. जर नवीनच कोडिंग शिकत असाल तर प्रथम C ही कोडिंग भाषा शिकावी असेल सांगितले जाते. कारण ही भाषा लवकर समजून घेता येते. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज ला स्ट्रक्चर्स प्रोग्रामिंग किंवा मदर प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा म्हंटले जाते.
C++
C++ ही प्रोग्रामिंग लॅंगवेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे आपल्या मनात जे आहे, ते कोड स्वरूपात टाईप करून आपण सॉफ्टवेअर बनवू शकतो. या लँग्वेज चा वापर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बनवण्यासाठी केला जातो. या प्रोग्रामिंग लँग्वेज चे सॉफ्टवेअर ह्या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता.
Java
Java ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज चा वापर सॉफ्टवेअर, Mobile App Development, Web-based Applications, Gaming Applications, Cloud-based Applications बनवण्यासाठी केला जातो.
Python
पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज ही सर्वात सोपी आहे. ही प्रोग्रामिंग लँग्वेज C, C++ आणि Java ह्यांच्या पेक्षा सर्वात सोपी आहे. ह्या लँग्वेज चा वापर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, वेबसाइट, मशीन लर्निग, Artificial Intelligence (AI) ह्यामध्ये केला जातो.
PHP
PHP प्रोग्रामिंग लँग्वेज वेबसाईट बनवल्यानंतर वेबसाईट च्या वेब सर्वर साठी वापरली जागे. जुनी भाषा म्हणून, php प्रोग्रामिंग भाषेचा वापर सुलभ करण्यासाठी फ्रेमवर्क, ग्रंथालये आणि ऑटोमेशन साधने तयार करणार्या वापरकर्त्यांच्या मोठ्या पर्यावरणातील पीएचपीचा फायदा होतो. पीएचपी कोड चा वापर करून डीबग करणे देखील सोपे आहे.
कोडिंग कुठून शिकायची?
इचलकरंजी मध्ये नामवंत सॉफ्टवेअर कंपनी कोडिंग ट्रेनिंग क्लास (coding classes)देते. याचे वैशिष्ट म्हणजे तुम्ही एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कोडिंग शिकून त्यामध्ये तज्ञ होवू शकतात.
….तर आजचं जॉइन करण्यासाठी पुढील नंबरवर संपर्क करा – 9850061006, 95700910006
हेही वाचा :