What’sApp चा दणका! एका महिन्यात बंद केली १८ लाख खाती!

WhatsApp ने भारतातील जवळपास 18 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. नवीन IT नियम २०२१ नुसार मार्च महिन्यात भारतातील १८ लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. तसंच या आधी देखील फेब्रुवारीमध्ये देशात अशा १४ लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली असल्याचं सोमवारी (data) व्हाट्सअ‍ॅपने कंपनीने सांगितलं.

दरम्यान, त्याच महिन्यात देशातून ५९७ तक्रारी अहवाल प्राप्त झाले आणि ७४ खाती ‘कारवाईयोग्य’ असून व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हंटले आहे की, IT नियम २०२१ नुसार, आम्ही मार्च २०२२ महिन्यासाठीचा आमचा अहवाल प्रकाशित केला होता. या मध्ये वापरकर्ते ग्राहकांच्या-सुरक्षा अहवालात वापरकर्त्याच्या तक्रारी आणि WhatsApp ने केलेल्या संबंधित कारवाईचा तपशील आहे. प्रतिबंधात्मक कारवाई द्वारे. WhatsApp ने मार्चमध्ये १८ लाखांपेक्षा जास्त खाती बंदी घातली असल्याचं सागंतिलं आहे.

कंपनीने वापरकर्त्यांनी शेअर केलेला १ ते ३१ मार्च दरम्यानचा (data) डेटा WhatsApp ने बंदी घालण्यात आलेल्या भारतीय खात्यांची संख्या हायलाईट केलं आहे. ज्यामध्ये त्याच्या ‘रिपोर्ट’ वैशिष्ट्याद्वारे वापरकर्त्यांकडून मिळालेल्या नकारात्मक गोष्टींचा समावेश असतो. तसंच गेल्या काही वर्षांपासून, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली असल्याचंही सांगितलं आहे.

हेही वाचा :


भूल भुलैया 2 चे टायटल ट्रॅक आउट..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *