WhatsApp चं नव्या अपडेटने यूजर्सना होणार फायदा…

whatsapp use without internet

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. WhatsApp सातत्याने युजर्ससाठी नवनवे फीचर्स (WhatsApp Features) लॉंच करत असतं. आता WhatsApp मल्टी डिव्हाइस अपडेट (Multi Device Feature internet) रोलआउट करत आहे. हे नवं फीचर बग्स फिक्स आणि इतर काही बदलांसह रिलीज केलं जात आहे.

हे अपडेट डेस्कटॉप आणि WhatsApp Web वर्जनसाठी रिलीज केलं जात आहे. लवकरच हे अपडेट अँड्रॉइड आणि iOS युजर्ससाठी जारी केलं जाईल. WhatsApp मल्टी डिव्हाइस फीचर डेस्कटॉप आणि वेब वर्जनसाठी सध्या बीटा फेजमध्ये आहे.

Multi Device Feature च्या मदतीने युजर्स चार डिव्हाइसवर एकच WhatsApp Account वापरू शकतील. त्यासाठी फोनमध्ये अॅक्टिव्ह इंटरनेटचीही गरज नाही. आतापर्यंत WhatsApp Web किंवा WhatsApp Desktop वापरण्यासाठी युजर्सच्या फोनमध्येही अॅक्टिव्ह इंटरनेट (internet) असणं गरजेचं होतं. पण नव्या अपडेटनंतर युजर्स फोनमध्ये विना इंटरनेटही WhatsApp दुसऱ्या डिव्हाइसवर वापरू शकतात.

WhatsApp वेब मल्टी-डिव्हाइस फीचरच्या मदतीने मेन फोन कनेक्ट न करता चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर WhatsApp वापरणं शक्य होणार आहे. याचाच अर्थ असा की तुमचा फोन बंद असला किंवा फोनचं इंटरनेट कनेक्शन बंद असलं तरी देखील तुम्हाला व्हॉट्सॲपचा वापरता येईल.

Android आणि iOS अशा दोन्ही युजर्ससाठी हे अपडेट मिळेल. iOS वर या महिन्याच्या अखेरीस अपडेट मिळू शकतं. तर Android युजर्ससाठी एप्रिलच्या अखेरपर्यंत हे मल्टी डिव्हाइस फीचर मिळू शकतं.


हेही वाचा :


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *