घरात विजेचा शॉक लागण्यापासून होईल बचाव, या गोष्टी लक्षात ठेवाच!

मुंबईसह देशभरातील अनेक शहरांत उन्हाची तिव्रता वाढली आहे. अनेक शहरांत पारा 40 च्या पुढे गेला आहे. उन्हाळ्याच्या या दिवसांत पंखा, एसी, कुलर अशा अनेक इलेक्ट्रिक गोष्टी सतत वापरल्या जातात.उन्हाळ्यात अनेकदा लोडशेडिंगही मोठ्या प्रमाणात होतं असतं. अनेकदा एसीला किंवा इतर इलेक्ट्रिक गोष्टींना (Voltage) शॉक लागल्याच्या घटनाही समोर येतात. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणं, काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे यामुळे घरात कोणालाही विजेचा शॉक किंवा करंट लागण्यापासून बचाव होईल.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या अनेक घटना समोर येतात. अशात घरात ‘सर्ज प्रोटेक्शन डिव्हाइस’ (Surge Protection Device) न लावल्यास सतत व्होल्टेज (Voltage) वाढल्याने घरातील अनेक विजेची उपकरणं खराब होऊ शकतात. ‘सर्ज प्रोटेक्शन डिव्हाइस’ ट्रान्सएंट व्होल्टेजला रोखून धरतं आणि सर्जला अर्थमध्ये पाठवतो, ज्यामुळे डिव्हाइसला बाय-पास केलं जातं. अशाप्रकारे महागडी इलेक्ट्रिक डिव्हाइस सुरक्षित राहतात आणि शॉर्ट सर्किट आणि शॉक लागण्याची शक्यता कमी होते.
घरात इलेक्ट्रिक वायर घेताना योग्य रेटिंग आणि योग्य क्वॉलिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जवळपास 13 टक्के आगीच्या घटना, शॉर्ट सर्किट खराब वायरिंगमुळे होतात. जर एखादं घरं 20 वर्ष जुनं असेल तर घरात असलेल्या विजेच्या तारांमध्ये इलेक्ट्रिक उपकरणं सांभाळण्याची ताकद नसते. त्यामुळे अशा अपघातांपासून वाचण्यासाठी चांगली क्वॉलिटी आणि चांगले रेटिंग असणाऱ्या वायर खरेदी करणं गरजेचं आहे.
घरात लहान मुलांना आणि इतरांना इलेक्ट्रिक शॉकपासून वाचवण्यासाठी RCCB (Residual Current Circuit Breaker) किंवा ELCB (Earth-Leakage Circuit Breaker) चा वापर करणं आवश्यक आहे. घरात विज लीकेज झाल्यास हे सर्किट ब्रेकर काही सेकंदात सर्किट तोडून विजेच्या झटक्यापासून वाचवू शकतं. गांभीर्याची बाब म्हणजे हे सर्किट ब्रेकर जवळपास 90 टक्के घरांमध्ये नसतं. परंतु काही राज्यात RCCB किंवा ELCB अनिवार्य करण्यासाठी योग्य पाऊलं उचलण्यात आली आहेत.
हेही वाचा :