ठाकरेंचा काँग्रेसला ‘दे धक्का’, जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात…

अहिल्यानगरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष(political news) किरण काळे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. आज रविवारी (दि. 23) अखेर किरण काळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेशानंतर अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाची मशाल ज्योत फिरवणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

किरण काळे यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश(political news) केल्यानंतर म्हटलंय की, आम्ही अहिल्यानगर येथून आलोय आणि अत्यंत खुश आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मातोश्रीवरून गर्जना केली त्याच मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केलाय. अनेक लोक सत्तेसाठी पक्षातून बाहेर पडतायत. पण आम्ही कोणत्याही निवडणूक समोर नसताना संघर्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. पडत्या काळात शिवसेनेमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढणार आहोत.

हा प्रवेश करण्यामागे काही कारणे आहेत. स्थानिक पातळीवर राजकारण आहे, ते महत्त्वाचं आहे. काही लोक हिंदुत्वाचा विषय चुकीच्या पद्धतीने पुढे नेत आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या प्रतिमा शिवजयंतीच्या रॅलीत पाहिल्या, हे आम्ही सहन करणार नाही. अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाची मशाल ज्योत फिरवणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले.

आम्ही कोणावरच नाराज नाही, नाराजीतून हा प्रवेश नाही. आव्हानात्मक परिस्थिती असताना आम्ही पडत्या काळात साथ देण्यासाठी हा विडा उचलला आहे. शिवसेना अहिल्यानगरमध्ये बळकट करण्याचे काम आम्ही करत आहोत. सर्व महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे की, खरं हिंदुत्व मातोश्रीवर आहे. काही लोक बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून वावरत आहेत. पण, त्यांचा बुरखा आम्ही फाडणार आहोत, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, मागील महिन्यात उद्धव ठाकरे गटातील 13 माजी नगरसेवकांसह 40 पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. तर यापुढेही आणखी काही पक्षप्रवेश शिंदेसेनेत होणार आहेत. तर ठाकरे गटातील काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत. त्यातच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले किरण काळे हे ठाकरे गटात ठाकरे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

गुरु रंधावा रुग्णालयात दाखल; गंभीर जखमी

चक्क मॉलमध्ये उडू लागला उंट, पाहायला शेकडो लोकांची गर्दी; मजेदार Video Viral

कोल्हापूर : ‘मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा….