चिमुरड्यांना छतावरून फेकलं, आईवर झाडली गोळी अन् बायकोला हातोड्यानं..

उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण(wife) हत्या करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी तरुणानेच आत्महत्या केली, म्हणजे एकाच कुटुंबातील 6 जणांनी या जगाचा निरोप घेतला. या तरुणाने आईला गोळी मारली, पत्नीला हातोड्याने मारहाण करत तिची हत्या केली आणि त्यानंतर मुलांचीही हत्या केल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकारानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली.

ही घटना मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील(wife) पाल्हापुरात घडल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना शनिवारी सकाळीच ग्रामस्थांना समजल्याने संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुण मानसिकरीत्या आजारी होता आणि त्याने खूप दारू प्यायली होती. शुक्रवारी रात्री त्याने आधी आपल्या मुलांना गच्चीवरून फेकून दिले, नंतर आईला गोळ्या घातल्या आणि नंतर पत्नीला हातोड्याने बेदम मारहाण करत तिची हत्या केली.

आता या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मानसिकरीत्या आजारी होता आणि त्याची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून स्थिर नव्हती. आरोपी अनुराग सिंहने आई सावित्री देवी (६२), पत्नी प्रियांका सिंग (४०), मुलगी अश्वी (१२), मुलगा अनुराग आणि मुलगी अरना यांची निर्घृण हत्या केली आहे.

सीतापूरचे एसएसपी चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, रामपूर पोलिसांना माहिती मिळाली होती की, मथुरा येथील एका मानसिक आजारी व्यक्तीने स्वतःच्याच घरातील पाच जणांची हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम प्रत्येक बाबीतून या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे, एकाच कुटुंबातील एवढ्या हत्या पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. मात्र, यापूर्वी दिल्लीतील बुरारी येथेही एकाच कुटुंबातील संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. तेव्हा जादूटोणासह अनेक बाबी समोर आल्या होत्या.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (11-05-2024)

मोदी 21 व्या शतकातील राजे; ते कुणाचेच ऐकत नाहीत

‘मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?’; उद्धव ठाकरे कडाडले