फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख सांगितली, मार्च महिन्याचं काय? आदिती तटकरेंनी विषय संपवला

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी (announced)बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनी मिळणार आहे.फेब्रुवारीचा हप्ता ८ मार्चला येणार आहे.दरम्यान, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख समोर आली आहे. त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्याचा हप्ता हा अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत होऊ शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात कधीही मार्च महिन्याचा हप्ता येऊ शकतो, असं आदिती तटकरेंनी सांगितलं.

अर्थसंकल्पानंतर मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत घोषणा होऊ शकते. असंही आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात २ हप्ते मिळणार आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये (announced)दिले जाणार आहे. महायुती सरकारने नेहमी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सक्षमरित्या सुरु ठेवणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता आल्यानंतर मग मार्च महिन्याचा हप्ता दिला जाणार असल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च महिन्यात २१०० रुपयांबाबत मोठी घोषणा होऊ शकते. अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये मिळणार की नाही हे कळणार आहे. राज्याचा (announced)अर्थसंकल्प १० मार्च रोजी सादर केला जाणार आहे. त्यानंतर महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हा हप्ता १५०० रुपयांचा असणार की २१०० रुपये याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा :

कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…

शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा

मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल