कोटीच्या दागिन्यांची चोरी टीप दिल्यानेच “सॅक” लंपास

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मध्यवर्ती बस स्थानक परिसरात “तिसरा डोळा” सक्रिय आहे(identity theft). बंदोबस्तासाठी पोलीस तैनात आहेत. एसटी बस मध्ये जागा मिळण्यासाठी नेहमीसारखी होणारी गर्दी नाही. तरीही मुंबईहून व्यापार करण्यासाठी आलेल्या सुरज चौहान यांची सुमारे एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली सॅक अज्ञात चोरट्यांकडून लंपास केली जाते. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कोणीतरी टीप देऊन ही घटना, हा गुन्हा घडवून आणलेला आहे. हे टिप्सर कोल्हापूरचे, पुण्याचे किंवा मुंबईचे असू शकतात. अशा प्रकारचे अनेक गुन्हे यापूर्वीही घडले आहेत आणि एखादा अपवाद वगळला तर सर्व गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे.

सुरज चौहान हे मुंबईचे रहिवासी आहेत. अनेक सराफी व्यापाऱ्यांच्याकडून(identity theft) विविध प्रकारचे सोन्याचे दागिने विश्वासावर घ्यायचे. त्यांची अनेक शहरात विक्री करायची आणि त्यातून कमिशन मिळवायचे असा त्यांचा व्यवसाय आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांची दक्षिण भारतातील घाऊक बाजारपेठ म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेत अनेक शहरातून सुरज यांच्यासारखे व्यापारी येत असतात. विशेष म्हणजे हे व्यापारी सराफ बाजार परिसरातील लॉजवर राहतात. जैन पद्धतीच्या खानावळीत जेवतात. या ठिकाणावरून गुन्हेगारांना टीप मिळू शकते किंवा यापूर्वी मिळाल्या आहेत आणि गुन्हे घडले आहेत.

सुरज चौहान हे मुंबईहून पुणे शहरात आले. तेथे थोडाफार व्यवसाय केला. त्यानंतर ते कोल्हापुरात आले. गुजरी, महादेव गल्ली, भेंडे, भाऊसिंगजी रोड, वगैरे परिसरात त्यांनी फिरून व्यवसाय केला. एखाद्या दुकानातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्याकडून बॅग लिफ्टिंग (सॅक) करणाऱ्या गुन्हेगारांना टीप दिली गेली असेल. ते ज्या लॉजवर उतरले होते तेथून ती दिली गेली असेल. सुरज चौहान हे सराशी व्यापारी आहेत. ते कोल्हापुरात आले आहेत. त्यांच्याकडे किमान एक कोटी रुपयांचे सोने आहे. ते त्यांनी सेक मध्ये ठेवले आहे.

हे सराईत गुन्हेगारांना माहीत असण्याची शक्यता अगदीच धुसरं आहे आणि म्हणूनच त्यांची कुणी तरी टीप दिली आहे. टीप मिळाल्याशिवाय अशा प्रकारचा गुन्हाच घडू शकत नाही. कोल्हापुरात अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी घडले आहेत आणि पोलिसांनी टीप देणाऱ्यांना पकडले आहे किंवा आधी टीप देणाऱ्यास पकडले आहे आणि नंतर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. किंवा आधी गुन्हेगार आणि नंतर टीप देणाऱ्या अटक केली आहे.

व्यवसाय करण्यासाठी कोल्हापुरात आलेले सराफी व्यापारी(identity theft) हे माघारी जाताना आराम गाडीला प्राधान्य (लक्झरी बस) देतात. पण सुरज चौहान यांनी एस. टी.बसचा पर्याय निवडला. आणि त्यांनी एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बॅगेत न ठेवता साध्या सॅकमध्ये ठेवले. ही सॅक मौल्यमान वाटणार नाही. अशा प्रकारची खबरदारी त्यांनी घेतली होती. पण ते एसटी गाडीत सीटर बसले आणि अगदी अडचणीच्या जागेतून त्यांची सॅक चोरट्याने लंपास केली. त्याची त्यांना भनक सुद्धा कशी लागली नाही, याबद्दलच सर्वसामान्य माणसाला आश्चर्य वाटते. पोलिसांच्या नजरेतून ही बाब सुटलेली नाही. हा मुद्दा पोलिसांनी तपास पटलावर घेतला आहे पण त्या मुद्द्यावर सर्वात शेवटी तपास होईल. कारण फिर्यादीवर लगेच संशय घेता येणार नाही. तथापि फिर्यादीत सूत्रधार निघाल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत.

सूरज चौहान यांनी मुंबईतून बाहेर पडताना पुणे, कोल्हापूर येथे कोणा कोणाशी मोबाईल वरून संवाद साधला? ते कोठे राहिले? त्यांनी जेवण कोणत्या हॉटेलात घेतले? याचा तपास होईल. ज्या सराफी दुकानात ते गेले तेथील कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाईल. अशा प्रकारचे गुन्हे वर केस येतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर घडलेला हा एक कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्याच्या चोरीचा गुन्हा फार काळ लपून राहणार नाही.
कुणीतरी सुरज चौहान यांच्या बद्दलची टीप दिलेली आहे. त्यानंतरच हा गंभीर गुन्हा घडलेला आहे, ही शक्यता गृहीत धरूनच स्थानिक पोलिसांचा तपास सुरू आहे. अद्याप तरी तपास अधिकाऱ्यांना महत्त्वाचे क्लू(धागेदोरे) मिळालेले नाहीत.

हेही वाचा :

वारकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवी योजना: ‘या’ वाहनांना मिळणार टोल माफी

कोल्हापूर पोलिसांनी न्यूटन कंपनीच्या संचालकाला फसवणुकीच्या आरोपाखाली केली अटक

पिझ्झा सोबत छोट्या पाकीटात मिळणारे ओरेगॅनो आता घरीच बनवा, सोपे व स्वादिष्ट रेसिपी