लोकसभा निवडणुकीत सांगली काँग्रेसमधील घडामोडीनं देशाचं (political news)लक्ष वेधून घेतलं. विशाल पाटलांनी बंडखोरी करीत मैदान मारलं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्षाला ‘अच्छे दिन’आले. त्यामुळे पटोले यांचे दिल्लीत ‘वजन’वाढले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला(political news) जनतेनं पसंती दिली तर, ‘भावी मुख्यमंत्री’कोण होणार, या चर्चा रंगल्या असताना मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी केलेल्या भाकीतामुळे काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील असेल की नाही , हे काळ ठरवणार,” असे विश्वजीत कदम म्हणाले. येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असेल असा दावा विश्वजीत कदम यांनी केला.ते सांगलीच्या मिरजेमध्ये सत्कार समारंभात बोलत होते.
विश्वजीत कदमांनी भाजपवर टिका करीत जनता भाजपला कंटाळली आहे. त्यामुळे मतदारांनी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगले लीड दिले. राज्यात 14 उमेदवार निवडून दिले आहेत, असे ते म्हणाले.
हेही वाचा :
इचलकरंजी येथे विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू
CM शिंदेंच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप, सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप : Video
धोनी, विराट अन् रोहित एकत्र लागले नाचायला, पंत रिल शेअर करत म्हणाला…