विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या शिंदे गटाला धक्का 

विधानसभा निवडणुकीपूर्वीच नगर शहरातून शिवसेनेच्या शिंदे गटाला(the assembly) धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे माजी नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून पायउतार करण्यात आले होते. त्यांच्या जागी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता या निर्णयावरून सातपुते यांनी देखील विधानसभेपूर्वी वेगळा निर्णय घेण्याच्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत सातपुते यांनी बैठकी घेत त्यांचे विचार जाणून घेत आहेत.

दरम्यान, येणाऱ्या तीन ते चार दिवसात ते आपली भूमिका(the assembly) स्पष्ट करणार असल्याची माहिती समजतंय. आमदारकीच्या तयारीत असलेले सातपुते पक्षातून बाहेर पडणार का? व पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे मध्ये प्रवेश करणार का? याबाबत तर्क-वितर्क आखले जात आहेत.

नगर शहर प्रमुखाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिलीप सातपुते यांनी गेल्या दोन वर्षात कोणत्याही प्रकारची शाखा स्थापन केलेली नाही. तसेच पक्षाला अपेक्षित असे काम त्यांच्याकडून झाले नाही, म्हणून त्यांना या पदावरून दूर केले आहे. दरम्यान येणाऱ्या विधानसभेपूर्वीच स्थानिक पातळीवरचे राजकारण लक्षात घेता नगर शहरातील शिवसेनेत मोठा बदल झाला आहे. सातपुते यांना पक्षातील अंतर्गत कारण दिले असले तरी त्यांच्या हकालपट्टीला किंवा पदावरून दूर जाण्याला लोकसभेचीच निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शिवसेनेमध्ये फुटू पडल्यानंतर दिलीप सातपुते यांनी ठाकरे यांना डावलत शिंदे गटाची वाट धरली होती. दरम्यान, सातपुते हे आमदारकीच्या तयारीत देखील असल्याचे बोलले जात आहे. मात्र शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे दिसते आहे.

यातच पक्षाकडून झालेली कारवाई पाहता व महाविकास आघाडीमधील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी असलेला संपर्क पाहता सातपुते पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये प्रवेश करू शकतात. तसेच वेळ पडल्यास सातपुते हे अपक्ष देखील उमेदवारी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान येणाऱ्या काळात ते काही भूमिका घेणार? याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका

गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये चाहत्यानं केलं गैरवर्तन… आक्षेपार्ह्य कमेंटनंतर गायिकेचं सडेतोड उत्तर

वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाला गालबोट; टोळक्याकडून विद्यार्थ्यांना मारहाण