एखादा चोर चोरी करताना कोणती पद्धत वापरेल किंवा काय शक्कल लढवेल (short)सांगता येत नाही. पण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगमध्ये मात्र एका चोरट्याने चोरी करताना जो प्रकार केला, जी पद्धत यअवलंबली तसं कोणी जन्मात ऐकलं नसेल. आणि यापुढेही कोणी अशी शक्कल लढवेल असं वाटतं नाही. अतिशय विचित्रपणे केलेल्या या चोरीचा व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अनोख्या चोरीच सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

उल्हासनगर शहरात एका चोरट्याने नग्न होऊन मोबाईल दुकानात घुसत मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम चोरून नेली. संतापजनक बाब म्हणजे जाताना दुकानातच त्याने विष्ठा केली. उल्हासनगर कॅम्प 5 च्या गायकवाड पाडा परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. याठिकाणी सुनील गुप्ता यांचं ओम साई राम कम्युनिकेशन हे दुकान आहे.मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने या(short) दुकानाचे पत्रे उचकटले आणि दुकानात प्रवेश केला. धक्कादायक बाब म्हणजे तेव्हा या चोराच्या अंगावर एकही कपडा नव्हता, तो चोर संपूर्ण नग्न अवस्थेत होता. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत तो कैद झाला. त्याने दुकानातील दोन मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरला आणि तो पसार झाला.
मात्र सगळ्यात धक्कादायक आणि किळसवाणी बाब म्हणजे चोरी करून परत बाहेर पडताना या चोरट्याने त्याच दुकानात बसून प्रात:र्विधी केला. त्याची ही प्रत्येक कृती दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून तो व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.सकाळी जेव्हा दुकानाचे मालक सुनिल गुप्ता दुकानात आले. दुकान उघडल्यानंतर (short)त्यांना चोरी झाल्याचा अंदाज आला. सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसल्यावर त्यानी दुकानातील सीसीटीव्ही चेक केला आणि सगळा प्रकार पाहून तेही संतापले. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
राष्ट्रवादीचे माजी आमदार यांच्या अपघाताचा व्हिडीओ समोर!
केस ओढले, मारहाण केली, शिवाय आक्षेपार्ह…’त्या’ दिवशी काय घडलं?, ऐश्वर्याचा मोठा खुलासा
IPL 2025 ची सुरुवात कधी पहिल्या सामन्यासाठी दोन संघ ठरले संपूर्ण वेळापत्रक जाहीर